Anandwan Sports

Anandwan Sports Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anandwan Sports, Sports Event, Anandwan Warora, Maharashtra, Warora.

30/08/2021

महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या फुटबॉल स्पर्धेचा semi final match ची काही क्षणचित्रे

*आनंदवनच्या भूमी वर फिट इंडिया फ्रीडम रन स्पर्धेचे आयोजन* ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमोहत्सवाच्या निमीत्ताने महारोग...
17/08/2021

*आनंदवनच्या भूमी वर फिट इंडिया फ्रीडम रन स्पर्धेचे आयोजन*

७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमोहत्सवाच्या निमीत्ताने महारोगी सेवा समिती संचालित, आनंद निकेतन महाविद्यालय व शारीरिक शिक्षण क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या मैदानावर फिट इंडिया फ्रीडम रन स्पर्धेचे आयोजन दिनांक १६/०८/२०२१ रोज सोमवार ला करण्यात आले होते. नुकताच भारत सरकार ने सुरू केलेला फिट इंडिया फ्रीडम रन २.० या उपक्रमाच्या प्रेरणेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. समाजातील लोकांमध्ये आपले शरीर स्वस्थ निरोगी ठेवण्यासाठी जागृतक्त निर्माण व्हावी त्याचे आणि खेळाचे महत्त्व कळावे देशासाठी भविष्यात मोठे खेळाडू तयार व्हावे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश्य होता.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे. प्रमुख पाहुणे म्हणून सत्कार मूर्ती पत्रकार वाल्मिक बन,उपप्राचार्य प्रा.राधा सवणे,बाबा आगलावे,दिवाकर टापरे,बाळू पिसाळ,डॉ.सागर वझे आदी उपस्थित होते.
ही धावण्याची संपूर्ण स्पर्धा खुल्या वयोगटामध्ये 1600 मीटर पुरुष गटात आणि 800 मीटर महिला गटामध्ये घेण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या भागांमधून ऐकून 200 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला. पुरुष व महिला गटामध्ये प्रथम सहा विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिक व मेडल देण्यात आले आणि इतर सहा स्पर्धकांना प्रोत्साहनपर मेडल देण्यात आले तसेच संपूर्ण स्पर्धकांना डिजिटल स्वरूपामध्ये ए प्रमानपत्र देण्यात आले .
पुरुष गटामध्ये प्रथम पारितोषीकाचा मानकरी ठरला प्रफुल देवतळे, द्वितीय मंगेश दोडके आणि तिसरा दिनेश चौधरी. त्याचप्रमाणे महिला गटामध्ये प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली डिंपल खाडे, द्वितीय जैनाब खान आणि तृतीय श्रुतिका तोडसे.तसेच या स्पर्धेचे आकर्षण ठरलेले लहान खेळाडू यांना सुद्धा मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा.तानाजी बायस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानावर नियमित सराव करणाऱ्या सर्व खेळाडूंनी संपूर्ण जबाबदारीने एकत्रित येऊन अतिशय सुंदर प्रकारे केले.स्वयंसेवका पासून तर पंच तसेच स्पर्धेचा निकाल जाहीर करण्या पर्यंत संपूर्ण काम या खेळाडूनीच केले.कॉविड19 च्या महामारी मुळे खूप दिवसा नंतर आशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन मैदानावर करण्यात आले होते.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या वेळेस कार्यक्रमाच्याचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांच्या हस्ते सत्कार मूर्ती पत्रकार वाल्मिक बॅन यांचा सत्कार महाविद्यालयातर्फे करण्यात आला.संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचे विद्यार्थिनी कु. दर्शना कुत्तरमारे आणि सायली उपरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन अमित दातारकर यानी केलं. सर्वांनी एकजूट येऊन ही स्पर्धा पार पाडली.



Congratulations to our men's hockey team for winning an Olympic Medal in hockey after 41 years. The team showed exceptio...
05/08/2021

Congratulations to our men's hockey team for winning an Olympic Medal in hockey after 41 years. The team showed exceptional skills, resilience & determination to win. This historic victory will start a new era in hockey and will inspire our ANC's to take up and excel in the sport.

CONGRATULATIONS 🎉🎊🤩
25/07/2021

CONGRATULATIONS 🎉🎊🤩


International Webinar
09/07/2021

International Webinar

04/03/2021
*अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठाचा संघ अमृतसर येथे रवाना*   दि.14 ते 16 मार्च...
12/03/2020

*अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठाचा संघ अमृतसर येथे रवाना*

दि.14 ते 16 मार्च 2020 या कालावधीमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्तरीय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठाचा मुला,मुलींचा संघ अमृतसरसाठी दि.11/03/2020 रोज बुधवारला रवाना झाला. मुलांच्या संघामध्ये कुणाल दातारकर,लिलेश दडमल,अजय येडमलवार,परमात्मा पंधरे,रोशन रणदिवे, प्रशांत खुलसंगे व मुलीच्या संघामध्ये किरन बारेकर,प्रणाली डुकरे,शितल पारोधे,वैष्णवी बन आणि संघ व्यवस्थापक म्हणून श्री. सुमित चव्हाण असे ऐकून 11 खेळाडू चा संघ गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.विद्यापीठाचे क्रीडा प्रमुख मा.सौ.डॉ. अनिता लोखंडे, संघाचे प्रशिक्षक मा.श्री. प्रा.तानाजी बायस्कर आणि संपूर्ण क्रिडा शिक्षकांनी वरील स्पर्धेसाठी खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

A.N.College, Anandwan girls team secured 1st place in Intercollegiate KHO- KHO(Women) tournaments ...organised by Gondaw...
28/02/2020

A.N.College, Anandwan girls team secured 1st place in Intercollegiate KHO- KHO(Women) tournaments ...organised by Gondawana University, Gadchiroli

श्रध्देय बाबा आमटे स्मृती         भव्य राज्यस्तरीय जोडो-भारत मॅरेथॉन 2020             RUN FOR ORGAN DONATION           D...
11/02/2020

श्रध्देय बाबा आमटे स्मृती
भव्य राज्यस्तरीय जोडो-भारत मॅरेथॉन 2020
RUN FOR ORGAN DONATION
Date- 09/02/2020 Sunday🏃🏃🏃

Address

Anandwan Warora, Maharashtra
Warora
442914

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anandwan Sports posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category