जन्नीदेवी कला व क्रीडा मंडळ दह्याट

  • Home
  • India
  • Wai
  • जन्नीदेवी कला व क्रीडा मंडळ दह्याट

जन्नीदेवी कला व क्रीडा मंडळ दह्याट स्थापना 1996
सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक व कला

सावित्रीच्या लेकी...... 📖🖊️स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या, महिलांच्या डोक्यावरील शेणाची पाटी उतरवून हातात वही पेन देणाऱ्या...
04/04/2026

सावित्रीच्या लेकी...... 📖🖊️

स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या, महिलांच्या डोक्यावरील शेणाची पाटी उतरवून हातात वही पेन देणाऱ्या थोर समाजसुधारक, पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन वाई तालुक्यातील दह्याट गावचे प्रगतशील शेतकरी
सौ. संगीता व श्री बाबुराव गणपत धनावडे यांची कन्या, न्यू इंग्लिश स्कूल बोरगावंची विध्यार्थीनी
कु.जान्हवी बाबुराव धनावडे हिची पुणे येथे महाराष्ट्र पोलीस दलात नियुक्ती झाली त्याबद्दल तिचे अभिनंदन आणि भावी यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 🇮🇳🤝

जन्नीदेवी कला व क्रिडा मंडळ दह्याट (जेसीसी)आयोजित🏆 जन्नीदेवी चषक २०२५ 🏆७ मे व ८ मे २०२५संयोजक - ग्रामस्थ मंडळ दह्याट जन्...
05/05/2025

जन्नीदेवी कला व क्रिडा मंडळ दह्याट (जेसीसी)
आयोजित
🏆 जन्नीदेवी चषक २०२५ 🏆
७ मे व ८ मे २०२५

संयोजक - ग्रामस्थ मंडळ दह्याट
जन्नीदेवी कला व क्रिडा मंडळ दह्याट (मुंबई) रजि.

🥇🏆 जननीदेवी चषक २०२५ 🏆🥇
22/04/2025

🥇🏆 जननीदेवी चषक २०२५ 🏆🥇

राम कृष्ण हरीरामनवमी सोहळ्याच्या निमित्ताने मौजे दह्याट येथे अभिजात शास्त्रीय संगीत कृष्णाकाठ संगीत महोत्सव हा एकदिवसीय ...
09/04/2025

राम कृष्ण हरी

रामनवमी सोहळ्याच्या निमित्ताने मौजे दह्याट येथे अभिजात शास्त्रीय संगीत कृष्णाकाठ संगीत महोत्सव हा एकदिवसीय संगीत कार्यक्रम वसंत ऋतूच्या प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.
कृष्णामाईच्या रम्य परिसरात रमणारे ह.भ.प सदानंद गायकवाड, श्रीगुरु संदीप सर जाधव, श्री संजय अपार सर यांनी हा कार्यक्रम सादर केला. दरम्यान आपणा सर्वांचे मार्गदर्शक श्रीगुरु राजेंद्र आप्पा शेलार, श्री सहदेव फणसे सर, श्री अशोक आबा मांढरे, श्री प्रशांत महांगडे, श्री रवींद्र गायकवाड, श्री शंकर शेठ धनावडे, देवराम महाराज जाधव आदी भागातील वारकरी, संगीत प्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा....🌺 या अभंगातून प्रत्येकाच्या मनांत प्रभू रामाचे दर्शन घडवणारे बापूंचे स्वर अंतःकरणाला भिडत होते.
मंत्रमुग्ध करणारे गायन श्रोत्यांना देवाच्या चरणाचे दर्शन घडवित होते.

उपस्थित सर्व साहित्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏
ग्रामस्थ मंडळ दह्याट🙏🚩

राम कृष्ण हरि... 🙏कोकिळा गाते मंजुळ गाणेआला वसंत बहरली वृक्षांची पाने !वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टी पुन्हा आपल्या सुंदर र...
02/04/2025

राम कृष्ण हरि... 🙏

कोकिळा गाते मंजुळ गाणे
आला वसंत बहरली वृक्षांची पाने !
वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टी पुन्हा आपल्या सुंदर रूपामध्ये येते. आम्रवृक्ष मोहरून जातो आणि सारा निसर्ग कळ्यांनी, पानांनी, फुलांनी सजू लागतो. नवचैतन्य आणि उत्कर्षाचा प्रतिक असलेल्या वसंताला ऋतूंचा राजा मानले जाते. वसंत ऋतूचे कृषी संस्कृतीशी अगदी घनिष्ठ नाते आहे. श्रीरामजन्म हा पर्वकाळ मोठ्या आनंदात भारतवर्षामध्ये याचं ऋतूत, चैत्र शुद्ध नवमीला (राम नवमी) साजरा केला जातो. उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसंताचा दिवस ॥ असे म्हणत संत नामदेवांनी प्रभू श्रीरामांच्या जन्माचे स्वागत केले आहे. याच काळात दह्याट येथे श्रीराम मंदिरात अखंड हरीनाम सोहळा आयोजित केला जातो. त्याचे औचित्य साधून आपण एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करीत आहोत.
" कृष्णाकाठ संगीत महोत्सव "
अभिजात शास्त्रीय संगीताची बरसात करणारा हा कार्यक्रम रविवार दि. ६ एप्रिल २०२५ रोजी, रात्री ९ वाजता श्रीराम मंदिर, मौजे दह्याट, ता. वाई येथे संपन्न होणार आहे. कृष्णाकाठावरील सर्व वारकरी, साधक, श्रोते, कलाप्रेमी, संगीतप्रेमी यांना या कार्यक्रमासाठी सस्नेह आमंत्रित करत आहोत.
आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढेल अशी आशा आहे.

निमंत्रक :
ग्रामस्थ मंडळ दह्याट, ता. वाई

'मरण माझे मरोन गेले....!!'माणसे मरणानंतर मरतात; पण संत मरायच्या आधी मरतात, ही तुकोबारायांची आध्यात्मिक अनुभूती आहे. रोग ...
19/12/2024

'मरण माझे मरोन गेले....!!'
माणसे मरणानंतर मरतात; पण संत मरायच्या आधी मरतात, ही तुकोबारायांची आध्यात्मिक अनुभूती आहे. रोग आणि भोग देहाला पीडा देऊन छळणारे आहेत. परमार्थिक नामसाधनेत अडथळा निर्माण करणारे शत्रू आहेत, हे तुकोबारायांनी जाणले, म्हणून भोगाचा त्याग केला. 'भोगी झाला त्यागी। गीती गाता पांडुरंग॥' विषय, विकार, संगतीच्या संगतीत राहून रोगाला जन्माला घालणारे माय-बाप आहेत; तसेच पापातून जन्माला येणारे मानसिक आणि शारीरिक तापाचे पोशिंदे, राखणदार आहे. त्यामुळे साधकाचा परमार्थ असमर्थ आणि व्यर्थ होतो, म्हणून त्यांनी मरणाला मारले, भोगाचा वध केला. 'भोगावरी आम्ही घातला पाषाण। मरणा मरण आणियेले॥'
तुकोबाराय सांसारिक असल्यामुळे, कधी कधी विषय, विकारांची खंडित झालेली चाल त्यांच्या सात्विक परमार्थाला छळत होती. देहातील विषय आणि विकारांचे कायमस्वरूपी निरसन व्हावे, म्हणून तुकोबारायांनी नेहमीप्रमाणे नामस्मरणाची काठी हातात घेऊन विषयासक्त देहाचा पाठलाग केला. 'हाती घेऊनी काठी। तुका लागला कलेवरा पाठी॥'
प्रेतरूप देहाच्या मरणाची अंतिम क्रिया ज्या स्मशानात पूर्णत्वाला जाते, तेथे देहाला घेऊन गेले. यामुळे काम, क्रोधासारखी मायेची कार्टी रडू लागली आणि यमधर्माचा धिक्कार करू लागली.
तुकोबाराय सांसारिक मरणाची पारमार्थिक अनुभूती प्रकट करतात, 'जाला प्रेतरूप शरीराचा भाव। लक्षियेला ठाव स्मशानीचा॥ रडती रात्रंदिवस कामक्रोधमाया। म्हणती हाय हाय यमधर्म॥' तुकोबाराय देहरूपी सांसारिक मरणाचा परमार्थिक सोहळा साधकांना सांगतात, 'मरण माझे मरोन गेले। मज केले अमर॥'
निरंतर नामसाधनेमुळे चित्त शुद्ध झाले. सगळे विषय, विकार पळून गेले; यामुळे तुकोबारायांचा दुःखरूप संसार सुखरूप झाला.
'संसाराचे अंगी अवघीच व्यसने। आम्ही या कीर्तने शुद्ध झालो॥' विषय, विकारांचा, दुःखाचा सगळा पूर ओसरून गेला. माझ्या देहाला नामस्मरणाचे बळ लाभले. देहात आता आत्मज्ञानाची ज्योत प्रकट झाली.
'माझिया मरणे। तुम्ही बैसविले ठाणे॥' विकारांच्या मरणामुळे विटेवरचा देव देहात वस्तीला येऊन राहिला, 'अवघा होय पांडुरंग। राहे धरुनिया अंग॥' देहातले विषय- विकार गेल्यामुळे देव अंगसंगात भरून राहिला, 'तुका म्हणे पांडुरंगे। अंगसंगे कवळिले॥' हा देव आणि भक्त ऐक्यभावाचा सोहळा विषय, विकारांच्या मरणामुळे अनुभवाला आला. तुकोबाराय वर्णन करतात,
'आपुले मरण पाहिले म्या डोळा। तो जाला सोहळा अनुपम्य।'
संतांनी जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मोक्षाचा मार्ग दाखविला तो शोधता आला पाहिजे. मरण कोणालाही चुकले नाही आपणा सर्वांना एक दिवस त्याच वाटेने जावे लागणार आहे. परंतु सखाराम बाप्पूंची ही वेळ नक्कीच जाण्याची न्हवती. अजून बरेच आयुष्य असायला हवं होतं. अवघ्या ५६/५७ वर्षांच्या जिवन प्रवासात ते त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आपणा सर्वांना सोडून गेले हे अनपेक्षित आणि मनाला दुःख देणारं आहे.
सोडून जातांना बाप्पूंनी अनेक कडू-गोड आठवणी मागे सोडल्या आहेत.
श्री.बाबुराव तुकाराम धनावडे हे नावं आपण सर्व अतिशय आदराने घेतो. त्यांच्या कुटुंबात दोन मुलं, सूना, नातवंडं, नातजावाई,परतुंडं या सोबत मान,सन्मान,ऐश्वर्य यांनी सर्वगुण संपन्नता होती.
सामाजिक जिवन जगात असतांना
बाबुदादा,गुरुजी,बाप्पू यांचे एक स्वतःचे असे वेगळे महत्व राहिलेले आहे. आज वडिलांच्या पुढे मुलाचं अस आकस्मित जाणं अत्यंत वेदनादायी आहे. वडिलांच्या वेदना/आक्रोष पाहून सारा गावं गहिवरला, सर्वांचं अंतःकरण भरून आलं.
बाप्पूंना निरोप देत असताना त्यांचे काही तिखट शब्द आठवत असेले तरीही त्यांचा दिलदार स्वभाव आणि निर्भिड पणा संवेदनशील मनांना व्याकुळ करणारा होता.
स्व.सखाराम बाप्पुंचे असे अकस्मात जाणे त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत वेदना देणारे आहे. आपण समस्त दह्याटकर त्यांच्या सोबत आहोत.
परमेश्वर त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देईल.
बाप्पूंना भावपूर्ण श्रध्दांजली 🌺🙏🌺

शोकाकुल - ग्रामस्थ मंडळ दह्याट

देशभक्ति की राहों के वो ही सच्चे राही हैं,बदन पे वर्दी जिनके कहते जिन्हें सिपाही हैं। 🇮🇳पुत्र व्हावा ऐसा गुंडा l ज्याचा ...
04/12/2024

देशभक्ति की राहों के वो ही सच्चे राही हैं,
बदन पे वर्दी जिनके कहते जिन्हें सिपाही हैं। 🇮🇳

पुत्र व्हावा ऐसा गुंडा l ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ll
विद्यमान सरपंच (ग्रामपंचायत दह्याट) श्री आनंदा गणपत धनावडे यांचा पुत्र कु.आदित्य आनंदा धनावडे हा आज त्याचे प्रशिक्षण पूर्ण करुन भारतीय सैन्यदलात रुजू झाला ही त्याच्या कुटुंबियांसमवेत समस्त दह्याटकरांसाठी अभिमानाची बाब आहे. आदित्यच्या अपार मेहनतीचे फळ त्याला मिळाले हा मनोनान आनंद आहे. आदित्यच्या अंगावरील इंडीयन अर्मीची वर्दी पाहून त्याच्या आईवडिलांच्या त्यागाची आणि त्यांच्या मेहनतीची जाणिव होते.
शेतकरी पुत्र देशसेवेसाठी तत्पर होतो तेव्हा त्याच्या कुटुबीयांनप्रती आदराची भावना निर्माण होते. एरव्ही आपण पोरांना वाईला पाठवायला सुद्धा चार वेळा विचार करतो. परंतु स्वतःच्या पोटचा गोळा या भारतमातेच्या सेवेसाठी पाठवायला जे धाडस एकजुट करावं लागत त्याची कल्पना करता येणार नाही.
राजमाता जिजाऊ मासाहेबांनी छत्रपतींना स्वराज्यासाठी दिलं तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदित्यावर त्याच्या आईवडिलांनी देशप्रेमी संस्कार केले याचा आदर आणि अभिमान वाटतो.

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा🇮🇳

महाराष्ट्र हा संतांचा, शूरवीरांचा, क्रांतिकारकांचा, समाजसुधरकांचा आहे. इथे राष्ट्रप्रेमाचे संस्कार घराघरात मिळतात एक दह्याटकर म्हणुन आदित्यचा अभिमान वाटतो.
कष्टकरी शेतकऱ्यांच्या कुटुंबातून त्याचे हे यश कौतुकास्पद आहे. अजोबांपासून घरात समजकर्याचा वारसा आहे त्याचा मान तो नक्कीच उंचावेल हा विश्वास आहे.
आदित्यच्या यशस्वी प्रवासासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा 🇮🇳❤️
आई जन्नीमाता सैदैव त्याच्या पाठीशी ऊभी राहील.

खुद से ज्यादा जिसे इस देश से प्यार होता है
वर्दी पहने वही सीमा का पहरेदार होता है,
दूर रहता है अपनों से अपनों के लिए फौजी
सारा ही वतन उसका अपना परिवार होता है।🇮🇳

भारतीय सैनिक कु.आदित्य आनंदा धनावडे यांची भारतीय सैन्यदलातील नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे समत दह्याट वासियांकडून खूप खूप अभिनंदन आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा, आशिर्वाद 🇮🇳❤️

ग्रामस्थ मंडळ दह्याट/ जेसिसी दह्याट - ता.वाई, जि.सातारा
सतिश धनावडे - दह्याट 🙏

14/08/2024

Comming soon

12/08/2024

Address

At Dahyat Post Vaigoan Tal Wai Dist Satara
Wai
412803

Telephone

7039443191

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जन्नीदेवी कला व क्रीडा मंडळ दह्याट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share