Amol Buchade

Amol Buchade Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amol Buchade, Pune.

12/07/2026

आशियाई पदक विजेता मल्ल दर्पण च्या यशामागची कहाणी

माझे मित्र महान महाराष्ट्र केसरी पै. दिलीप भरणे यांची कन्या कु शौर्या हिने गेल्या आठवड्यात जर्मनी येथे पार पडलेल्या ISSF...
30/06/2026

माझे मित्र महान महाराष्ट्र केसरी पै. दिलीप भरणे यांची कन्या कु शौर्या हिने गेल्या आठवड्यात जर्मनी येथे पार पडलेल्या ISSF जागतिक ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६ या स्पर्धेत २५ मी. पिस्तुल या प्रकारात रौप्य पदकाची कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित केले.शौर्या च्या या शौर्या चे कौतुक करण्यासाठी आज कुस्ती अकादमी वर तिचा सत्कार केला.
शौर्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून तिने पहिल्याच स्पर्धेत पदकाची कमाई केली. एक मुळशीकर आणि पैलवानकी वारसा आसलेल्या घरामधुनच बाळकडु मिळालेल्या शौर्याच्या कामगीरीचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. शौर्या ला आज मी पहिल्यांदाच भेटलो परंतु शौर्याच्या कमालीच्या आत्मविश्वासाची मी दाद देतो. भविष्यात शौर्या कडुन यापेक्षा ही मोठ्या यशाची आपेक्षा मला आहे. अभिनंदन शौर्या तुझे आणि तुझ्या सपोर्ट सिस्टिमचे आभिनंदन भरणे कुटूंबीयांचे 💐💐

आमचा युवा व्हॉलीबॉलपटू अलोक मनोज तोडकर(ABSF Volleyball Club, Pune) याचीISF World School Volleyball Championship – 2026, ...
13/06/2026

आमचा युवा व्हॉलीबॉलपटू अलोक मनोज तोडकर
(ABSF Volleyball Club, Pune) याची
ISF World School Volleyball Championship – 2026, चीन येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 🎉👏

जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवण्यासाठी तुला मनःपूर्वक शुभेच्छा. 🇮🇳🏐

महाराष्ट्रातील कुस्ती शौकीन व वस्ताद मंडळी यांना सप्रेम नमस्कार सध्या सोशल मीडियावर एक भावनात्मक साद मोठ्या प्रमाणात पहा...
11/03/2026

महाराष्ट्रातील कुस्ती शौकीन व वस्ताद मंडळी यांना सप्रेम नमस्कार सध्या सोशल मीडियावर एक भावनात्मक साद मोठ्या प्रमाणात पहायला मिळतीय महाराष्ट्राची जी परंपरा कुस्तीची आहे त्यातील सर्वात मोठा किताब “महाराष्ट्र केसरी” हा एक होण्यासाठी. महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या मनातील देखील हीच भावना आहे महाराष्ट्राच्या राजकारण्यांच्या मनातील देखील हीच भावना आहे आणि महाराष्ट्रात जे काही दोन-तीन संघ तयार झालेत त्या संघातील सर्व पदाधिकाऱ्यांची पण हीच इच्छा आहे की महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी व्हावी परंतु गेल्या काही वर्षांमध्ये अहंकारापोटी विशिष्ट नावाला विरोध म्हणून या नवीन संघटनेचा जन्म झाला.परंतु जर आपल्याला हे सगळं पूर्ववत आणायचं असेल तर थोड्यात इतिहासाचा अभ्यास हा करावाच लागेल प्रत्येक गोष्टीला काहीतरी पार्श्वभूमी असते आज एक महाराष्ट्र केसरी म्हणून मलाही खूप अभिमान आहे की या महाराष्ट्र सारख्या राज्याचा मी कुस्तीतला एक किताब विजेता पैलवान आहे जेव्हा तो किताब मी मिळवला तेव्हा पुणे जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात मला एक नवीन ओळख मिळाली आणि आपल्या महाराष्ट्राकडे असा एक कुस्ती मधला मोठा किताब आहे की जो जगात असणाऱ्या मराठी माणसांना आकर्षित करतो मला तर असं वाटतं की कुस्ती हा एक आपल्या संस्कृतीचा भाग आहे त्याचं जतन करायचं असेल तर इतिहासाचा अभ्यास नक्कीच केला पाहिजे मला कुठल्याही या ठिकाणी संघटनेला किंवा कुठल्याही वैयक्तिक अधिकाऱ्यांना नाव ठेवायचे नाहीत परंतु महाराष्ट्र केसरी या किताबाची पार्श्वभूमी पाहता हा किताब किती साली चालू झाला हा कोणी चालू केला ज्या संघटनेने इतक्या वर्ष हा किताब वाढवला या किताबाची कीर्ती जगात वाढवली ती संघटना कोणती आहे त्या संघटनेने कशा पद्धतीने या स्पर्धा हाताळल्या आज माती वेगळी आणि मॅट वेगळी यातला विजेता अंतिम फेरीमध्ये मॅटवर का खेळवला जातो 90 च्या दशकामध्ये तो विजेता मातीवर का निवडला जात होता मग मॅट आणि माती याची सांगड घालून महाराष्ट्र केसरी किताब का दिला गेला याच्या पाठीमागे काय टेक्निकल गोष्टी आहेत यात जाणून घेतल्याशिवाय हा तिढा सोडवता येणार नाही हा तिढा सोडवायचा असेल तर माती आणि मॅट राज्य संघटना आणि राष्ट्रीय संघटना या सगळ्यांच्या विचारांचा मेळ घातला पाहिजे. राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब अशा दोन पद्धतीच्या स्पर्धा या एका स्पर्धेत पार पडतात त्या कोणत्या पद्धतीने पार पडत होत्या का पार पडत होत्या हे असं नाव प्रत्येकाच्या सर्टिफिकेटवर का असतं का होतं आणि जुन्या लोकांनी हे कसं जुळवलं होतं याचा अभ्यास करावा लागेल अलीकडच्या संघटनेच्या भांडणांमध्ये मॅटच्या संस्थेची सलग्नता मातीच्या संस्थेची सलग्नता कुणाला होती का होती आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा एकच संस्था का पार पडत होती याचा विचार केला तर हा प्रश्न सहज सुटण्यासारखा आहे फक्त हा प्रश्न सोडवण्याचा सगळ्यांमध्ये इच्छा हवी जी फक्त महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांच्याच मनात आहे याच्या व्यतिरिक्त ही इच्छा जर या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मनात असेल तर एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणे काही अवघड नाही याच्याही पुढे जाऊन मी सांगतो महाराष्ट्राला जी संस्कृती आहे जुनं जपायची आपण खूप म्हणतो की आपण पुरोगामी आहोत पण याच्यासोबत आपण आपण आपली संस्कृती देखील जपणारे आहोत जर 1952 सली स्थापन झालेल्या एका संघटनेने हे रोपट लावल सगळं घडवून आणून तिची पायाभरणी केली असेल त्या गोष्टीला मोठे महत्त्व प्राप्त करून दिले असेल आज 68 वी महाराष्ट्र केसरी पार पडत असेल तर आत्तापर्यंत ज्या संघटनेचे कर्तुत्व आहे या किताबासाठीच त्या संघटनेला जर ही स्पर्धा करण्याचा परत मान मिळाला तर तो आपल्या सर्वांच्यासाठी एक आनंददायी ठरेल परंतु हे करत असताना सर्व संघटकांनी एका संघटनेमध्ये काम करावं हेही तितकंच महत्त्वाचं आहे असं माझं म्हणणं आहे इथे कुठेही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन विशेषतः राजकारण्यांनी एकत्र येऊन खेळामध्ये तरी राजकारण न येऊ देण्याचा मानस केला तरच हे सहज शक्य आहे आज महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात जे महाराष्ट्र केसरी आहेत हिंदकेसरी आहेत यांच्या मनामध्ये मोठी घाल मेल आहे हे असं नाही झालं पाहिजे वर्षाला दोन दोन तीन महाराष्ट्र केसरी झाल्या तर त्या पदाची गरीमा राहत नाही आणि मुलांमध्ये इर्षा राहत नाही याचे नकारात्मक परिणाम वाढू शकतात याने महाराष्ट्राची कुस्ती कितपत वर जाईल याचा विचार करावा लागेल तसेच अशा पध्दतीने महाराष्ट्राची कुस्ती किती खाली गेली याचाही विचार करावा लागेल म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या काही संघटना आहे यांच्यामध्ये मिलाप घडवून आणला पाहिजे आणि जी जुनी संघटना आहे परिषद या परिषदेलाच तो मान मिळाला पाहिजे तरच ती स्पर्धा या देशाचं भूषण ठरेल आणि ही संघटना देखील आपल्या देशाचे भूषण ठरेल संघटना ही कधीही कुणाच्या मालकीची नसते यातून आपल्याला हे दाखवून देता येईल आणि हे जर राजकारण्यांनी अमलात आणलं सगळे पैलवान तर यासाठी तयार असतीलच मी स्वतः यासाठी एकच “महाराष्ट्र केसरी”स्पर्धा करण्यासाठी इच्छुक आहे ती पण अशा पद्धतीने झाली तर सोन्याहून पिवळच आहे परंतु जर ही या पद्धतीने देखील ती नाही झाली तरी ती एकच कुठली तरी व्हावी अशा विचारांचा देखील मी आहे परंतु या दोन दोन संघटनांच्या भांडणांमध्ये जे काही महाराष्ट्राच्या कुस्तीचा विचार कमी होत चाललेला आहे हे कुठेतरी नक्कीच थांबले पाहिजे.
सदरचा विचार हा एक या महाराष्ट्राचा “महाराष्ट्र केसरी” आणि “रुस्तम ए हिंद “म्हणून मी व्यक्त करत आहे. एखाद्या संघटनेचा पदाधिकारी जरी असलो तरी कुस्तीचा विकास सर्वप्रथम मी मानतो. खेळासाठी कोर्ट कचेऱ्या ह्या फक्त वेळकाढूपणा ठरत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मी एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा एक व्हावी यासाठी काही पदाधिकार्यांशी वार्तालाप करत आहे आणि येणार्या काही दिवसात तो करत ही रहणार आहे. सर्वांना बरोबर घेवुन जर हे होत आसेल तर ठीकच आहे. किंवा ठीक करण्यासाठी देखील सरकारची मदत घेवुन हे सर्व सुरळीत करावेच लागेल व त्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते सर्व करणारच आहे
धन्यवाद
जय हिंद
जय महाराष्ट्र
“एक महाराष्ट्र,एक महाराष्ट्र केसरी किताब “

30/01/2026

आम्हा खेळाडूंच्या स्वप्नांना बळ देणारे दादा.
दादा आपले विचार कायम प्रेरणा देत राहातील 😌

हिन्दुहृदयसम्राट शतशःनमन 🙏🏻
23/01/2026

हिन्दुहृदयसम्राट शतशःनमन 🙏🏻

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Buchade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share