23/04/2026
*अभिरुची शिबीर २०२६* - *पर्व दुसरे*
श्रेयस्व इव्हेंट्स अँड मोअर व अभिरूची रिसॉर्ट आयोजित
अभिरुची शिबीर २०२६ - पर्व २
छोट्या मित्रांनो, यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करायचं ठरवलंय बरं?
खायचं, प्यायचं, खेळायचं आणि मजा करायची. हो ना?
मग चला, आपण सगळे मिळून एका निसर्गरम्य ठिकाणी मनसोक्त हुंदडायला जाऊयात. खेळता खेळता नवनवीन गोष्टी शिकुयात. भरपूर मैदानी खेळ खेळुयात. लख्ख
चांदणं बघत, गोष्टी ऐकत निजुयात.
आमच्यासोबत ३ दिवस मजा करायला तयार आहात ना?
आम्ही वाट बघतोय.
आपण काय काय मजा करणार आहोत:-
१) किल्ले बांधणार ते पण ऐतिहासिक..
२) नाटक नाटक खेळणार
३) भटकंती करणार
४) खजिना शोधणार
५) मैदानी खेळ खेळणार
६) शेकोटीभोवती दंगा घालणार
७) पारंपरिक पदार्थांवर ताव मारणार
८) पुस्तकं वाचणार
९) अडगळीत गेलेले जुने खेळ नव्याने शिकणार
१०) सेंद्रिय शेती अभ्यासणार
मुलांचं लहानपण जपण्यात आमचाही खारीचा वाटा..
*कधी*:- २२,२३ आणि २४ मे २०२६
*कोणासाठी*:- ८ ते १४ वर्षं
*फीस* - *८,७००/-*
अधिक माहितीसाठी संपर्क..
१) स्वप्नाली देशपांडे - ९६८९९३८९४९
२) मुग्धा मायदेव केळकर - ८३२९४८२८६२
३) स्वानंद दंडे - ९८८१२०३१४२