India Treks

India Treks माझ्या अंतरीची मला साद आहे, आयुष्य माझे खुळा नाद आहे.
(14)

ट्रेकिंगच्या विश्वात लाखोंनी आपआपले भटकंती ग्रुप बनवले आहेत. भटकंती विश्वसमृद्ध केली आहे. आम्ही सुद्धा इंडिया ट्रेक्स या नावाने एक निखळ आनंदाने भरलेलं भटकंती ग्रुप पर्यावरणाची काळजी, इतिहासाचा आदर, गडकिल्ल्यांचा मान आणि हिमालयाचा आदर ठेवून बनवला आहे. आता इतके सारे ग्रुप असताना आणखीन भर कशाला ………
सौंदर्य हे वस्तू मध्ये नसून ते दृष्टीत असावं लागतं. भटकंती मध्ये व्यावसायिक नसलो तरी इंडिया ट्रेक्

स हे जिज्ञासापोटी केलेले अनामिक धाडस आहे. भटकंतीच्या दरम्यान हजारोंच्या वर ट्रेक्स केले जातात पण काही मनाला भुरळ पाडणारे मोजकेच असतात. ते एक वेगळच कुतूहल निर्माण करतात. हेच अनुभवण्यासाठी इंडिया ट्रेक्स.
भटकंतीची वाट तशी आम्हाला मळलेली नाही. तरी सुद्धा ट्रेक करत गेलो, खाचगळग्यांच्या विवरातून, गिरीकड्यातुन, नद्यानाल्यातुन व्यसनापायी काही पायाला भिंगरी लावली आणि आज आपण जसा आनंद घेतो तास इतरांनाही द्यावा ह्या संकल्पनेतून ही कलाकृती तयार झाली आहे. त्यांच्या कुंचल्यातुन एक एक दर्जेदार भटकंती बाहेर येईलच.
हिरवागार टवटवीत निसर्ग, घनदाट अभयारणे संपन्न पशुपक्षी व वन्यप्राणी जीवन , परंपरेने जपलेल्या देवराया, वळणावळणानी वाहणारी लोभसवाणी नदीपात्रे, प्राचीन लेणी व गुंफा, इतिहास काळातील दुर्गम घाटमार्ग, लाल-काळ्या मातीच्या सुंदर पण कधी चकव्या पायवाटा, ऐतहासिक महत्व असलेले गडकिल्ले, दिमाखदार आखीव - रेखीव नक्षीकाम असलेली जुनी मंदिरे अशा एक ना एक भटकंतीने आपल्या आयुष्यात सुखाचे आठवणींचे गाठोडे भरण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच तरी त्याला तुम्ही उस्फूर्त प्रतिसाद द्याल ह्याच आशेवर हे इंडिया ट्रेक्स आपल्यासमोर सादर करीत आहे.

Address

Nigadi, Pune
Pune
411027

Telephone

7066081213

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when India Treks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to India Treks:

Share

Category