Pune Book Festival

Pune Book Festival On behalf of National Book Trust, India, ‘Pune Book Festival 2025’ is being organized in Pune

05/05/2026

पुणे बाल पुस्तक जत्रा २०२६’ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘जादूच्या प्रयोगा’नेकेवळ लहानग्यांनाच नाही, तर मोठ्यांनाही अचंबित केले होते !
डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या जादुई दुनियेत हरवून जाताना मुलांच्या चेहऱ्यावरील कुतूहल आणि खळखळून हसणे खऱ्या अर्थाने या जत्रेची रंगत वाढवून गेले. एकापेक्षा एक भन्नाट जादूच्या ट्रिक्सनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
पुस्तकांच्या आणि साहित्याच्या जगात वावरताना, मनोरंजनाची ही जादुई सफर सर्वांसाठीच एक अविस्मरणीय आणि आनंददायी अनुभव ठरली!

#पुणे

गदिमांच्या शब्दांना आणि बाबुजींच्या सुरांना जेव्हा या चिमुकल्यांचा निरागस आवाज मिळाला, तेव्हा संपूर्ण सभागृह भारावून गेल...
04/05/2026

गदिमांच्या शब्दांना आणि बाबुजींच्या सुरांना जेव्हा या चिमुकल्यांचा निरागस आवाज मिळाला, तेव्हा संपूर्ण सभागृह भारावून गेलं!
‘पुणे बाल पुस्तक जत्रे’मध्ये आज ‘स्वरतरंग संगीत अकादमी’ने सादर केलेला ‘बाल-गीत रामायण’ हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने एक सुवर्णक्षण ठरला. लहान मुलांनी उभारलेला हा ‘राम कथेचा सेतू’ उपस्थितांच्या मनाचा ठाव घेणारा होता.
साहित्याच्या या जत्रेत आज संगीताच्या माध्यमातून झालेले हे रामकथेचे संस्कार पुणेकर नक्कीच कायम लक्षात ठेवतील.

#पुणे

‘स्वरतरंग संगीत अकादमी’ प्रस्तुत आणि चिमुकल्यांच्या सुमधुर आवाजात सजलेल्या ‘बाल-गीत रामायण’ या अप्रतिम कार्यक्रमाने ‘पुण...
04/05/2026

‘स्वरतरंग संगीत अकादमी’ प्रस्तुत आणि चिमुकल्यांच्या सुमधुर आवाजात सजलेल्या ‘बाल-गीत रामायण’ या अप्रतिम कार्यक्रमाने ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ महोत्सवाची अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरणात सांगता झाली. गदिमा आणि बाबुजींच्या अजरामर काव्याचा ‘राम कथेचा सेतू’ या लहानग्यांनी आपल्या स्वरांनी अचूक उभा केला आणि सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले.
याच शानदार कार्यक्रमात महोत्सवाचा अधिकृत समारोप सोहळा पार पडला. या सत्रात मुख्य संयोजक श्री. राजेश पांडे आणि ‘संवाद पुणे’चे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनील महाजन यांनी या महोत्सवाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
या विशेष क्षणांची शोभा वाढवण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
त्यांच्या उपस्थितीने बालकलाकारांचा आणि आयोजकांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला.
सलग ५ दिवस चाललेल्या या साहित्याच्या आणि पुस्तकांच्या जत्रेला निरोप देताना,
पुढच्या वर्षीच्या अशाच एका भव्य महोत्सवाची आस लागून राहिली आहे!

#

ऐकत आहात ना पुणेकरकाय म्हणतात छोटे पुणेकर …..?
04/05/2026

ऐकत आहात ना पुणेकरकाय म्हणतात छोटे पुणेकर …..?

खेळातील एकाग्रता आणि चेहऱ्यावरचा आनंद...हेच तर बालपणाचे सर्वात सुंदर रंग असतात! पुणे बाल पुस्तक जत्रा म्हणजे केवळ पुस्तक...
04/05/2026

खेळातील एकाग्रता आणि चेहऱ्यावरचा आनंद...
हेच तर बालपणाचे सर्वात सुंदर रंग असतात! पुणे बाल पुस्तक जत्रा म्हणजे केवळ पुस्तकांची दुनिया नाही, तर मुलांच्या कलागुणांना आणि उत्साहाला दिलेली एक सुंदर जोड आहे. इथल्या विविध उपक्रमांमध्ये रमलेली मुलं आणि त्यांचा हा निखळ उत्साह पाहून जत्रेची रंगत आणखीनच वाढली आहे.

पुणे बाल पुस्तक जत्रेमधील एक छोटे पुणेकर गोष्टींच्या दुनियेत नेमकं काय “खरंच असं झालं” ? हे शोधताना !
04/05/2026

पुणे बाल पुस्तक जत्रेमधील एक छोटे पुणेकर
गोष्टींच्या दुनियेत नेमकं काय “खरंच असं झालं” ? हे शोधताना !

किताबों में झुके सिर, जिंदगी भर उठे रहते हैं...📖हे शब्द ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’मध्ये अक्षरशः सार्थ ठरताना दिसत आहेत. इथल...
04/05/2026

किताबों में झुके सिर, जिंदगी भर उठे रहते हैं...📖
हे शब्द ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’मध्ये अक्षरशः सार्थ ठरताना दिसत आहेत. इथल्या प्रत्येक कोपऱ्यात मुलं नव्या गोष्टी वाचण्यात आणि कल्पनेच्या दुनियेत जगण्यात मग्न आहेत. आज पुस्तकांत रमलेली ही निरागसता, उद्याच्या उज्ज्वल आणि आत्मविश्वासू भविष्याची नांदी आहे. या ज्ञानोत्सवातील असाच एक टिपलेला सुंदर क्षण!

बाल पुस्तक जत्रेमध्ये शब्दांच्या विश्वात हरवलेली एक सुंदर शांतता... पुस्तकात मग्न असलेली ती निरागसता. 📖✨
04/05/2026

बाल पुस्तक जत्रेमध्ये शब्दांच्या विश्वात हरवलेली एक सुंदर शांतता...
पुस्तकात मग्न असलेली ती निरागसता. 📖✨

पुस्तकांची पाने उलटताना हरवलेले डोळे आणि त्यांची ती निरागस धडपड! महोत्सवाची खरी रंगत तर या छोट्या मुलांमुळेच आहे. बाल पु...
04/05/2026

पुस्तकांची पाने उलटताना हरवलेले डोळे आणि त्यांची ती निरागस धडपड! महोत्सवाची खरी रंगत तर या छोट्या मुलांमुळेच आहे. बाल पुस्तक जत्रेतील या चिमुकल्या दोस्तांचे काही खास आणि नैसर्गिक क्षण.

21/12/2025

The whole of social media team together…🙌🏼✨

Ganpati Bappa Moryaa !!
Mangal Murti Moryaa !!

Event successful !!!

21/12/2025

पुण्याच्या शैक्षणिक वारशाचा मानबिंदू असलेल्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे विश्वस्त मा. श्री. प्रमोद दादा रावत यांची पुणे बुक फेस्टिव्हलला सदिच्छा भेट! 📚✨

Address

Furgueson Road
Pune
411005

Website

https://photoupload.pbf24.in/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Book Festival posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category