08/02/2026
"जागतिक कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत 'विवाह संस्कार विभाग' तर्फे 'शेतकरी वधू-वर परिचय मेळावा' मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
📍परमपूज्य गुरुमाऊलींच्या मंगल उपस्थितीत आणि माननीय मंत्री विखे पाटील साहेब तसेच माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
📍या मेळाव्यामध्ये ९०० हून अधिक वधू-वरांनी आपली नावनोंदणी करून परिचय दिला. विशेष म्हणजे, याच ठिकाणी १३ विवाह सामूहिक पद्धतीने अत्यंत थाटात लावून देण्यात आले, तर शेकडो विवाह जुळण्याच्या मार्गावर आहेत.
📍 उपस्थित वधू-वर, पालक, भाविक आणि सेवेकऱ्यांनी यावेळी परमपूज्य गुरुमाऊलींच्या सामाजिक विषयासह कौटुंबिक सुसंस्कार, हुंडाबळी व कुप्रथा निर्मूलन, व्यसनमुक्त संसार, या विषयावर उपस्थितांशी वैवाहिक हितगुज केले.
📍सोहळ्याने केवळ परिचयच करून दिला नाही, तर ग्रामीण भागातील विवाहांच्या एका मोठ्या सामाजिक प्रश्नाला व्यासपीठ मिळवून दिले.
#जागतिक_कृषी_महोत्सव२०२६ #श्रीस्वामीसमर्थ #गुरुमाऊली #नाशिक #शेतकरीपुत्र #वधूवरमेळावा #विवाहसंस्कार #सामूहिकविवाह #कृषीमहोत्सव #नितीनभाऊमोरे #आबासाहेबमोरे #राधाकृष्णविखेपाटील #गिरीशमहाजन