कोकण भूमी प्रतिष्ठान

  • Home
  • India
  • Mumbai
  • कोकण भूमी प्रतिष्ठान

कोकण भूमी प्रतिष्ठान Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from कोकण भूमी प्रतिष्ठान, Office No. 25 & 26, Ajay Shopping Center, T. H. Kataria Marg, Matunga Road (West), Mumbai.

एप्रिल मे 99 या चित्रपटाची ग्लोबल कोकण मराठी चित्रपट महोत्सवासाठी निवड.कोकणातील समुद्र किनाऱ्यावर पहिला मराठी चित्रपट मह...
04/02/2026

एप्रिल मे 99 या चित्रपटाची ग्लोबल कोकण मराठी चित्रपट महोत्सवासाठी निवड.

कोकणातील समुद्र किनाऱ्यावर पहिला मराठी चित्रपट महोत्सव,
रुपेरी वाळूच्या किनाऱ्यावर बसून मराठी सिनेमाचा आनंद.
यावर्षी 17 सिनेमा कोकणात चित्रित झाले. मराठी सिनेमांमध्ये मोठे बदल होत आहेत.
कोकणात चित्रित झालेले लोकप्रिय यावर्षीचे सिनेमा ग्लोबल कोकण चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवणार आहोत.

भविष्यामध्ये कोकणात सिनेमा उद्योग विकसित होण्यासाठी एक निश्चित दिशेने ॲक्शन प्लॅन बनवत आहोत. 18 फेब्रुवारी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मराठी सिनेमा कोकण आणि पालघर जिल्हा या विषयांमध्ये एक परिसंवाद आयोजित केला आहे. अनेक मान्यवर सेने कलाकार दिग्दर्शक निर्माते व या क्षेत्रातील अभ्यासक या सेमिनार मध्ये सहभागी होतील.

पहिल्या दिवशी हा मान राजेश मापुस्कर यांच्या
एप्रिल मे या सिनेमाला मिळणार आहे.
#ग्लोबल_कोकण_मराठी_चित्रपट_महोत्सव
#ग्लोबल_कोकण_महोत्सव
#शिवस्वराज्य_मराठी

#आदिशेष

#शिवस्वराज्य_मराठी

17/01/2026
भव्य शिवस्वराज्य मराठी उद्योग परिषद (५ वी )मराठी उद्योजक चळवळीला दिवसेंदिवस आपला प्रतिसाद वाढत आहे याबद्दल धन्यवाद. मुंब...
04/01/2026

भव्य शिवस्वराज्य मराठी उद्योग परिषद (५ वी )

मराठी उद्योजक चळवळीला दिवसेंदिवस आपला प्रतिसाद वाढत आहे याबद्दल धन्यवाद.

मुंबई पाठोपाठ, वसई विरार, ठाणे, पुणे ,पिंपरी चिंचवड, पालघर शाखा सुरू झाल्या सर्व टीमचे विशेष अभिनंदन.

कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने गेली पंधरा वर्षे दरवर्षी ग्लोबल कोकण हा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात येतो. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ,नेस्को गोरेगाव, येथे कोकणी आणि मराठी उद्योजकांचा हा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित केला जातो. दरवर्षी दोन ते तीन लाख निसर्ग प्रेमी पर्यटन प्रेमी कोकण प्रेमी या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होतात.

यावर्षी ग्लोबल कोकण महोत्सव पहिल्यांदा मुंबई बाहेर प्रत्यक्ष कोकणातील समुद्र किनाऱ्यावर आयोजित केला आहे. पालघर शहरापासून सहा किलोमीटर शिरगाव या अतिशय देखण्या समुद्रकिनाऱ्यावर हा महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात तीन ते चार लाख नागरिक भेट देतील.

अतिशय भव्य प्रमाणात हा महोत्सव आयोजित केला असून यावेळी 500 हून अधिक मराठी उद्योजक आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग आणि प्रमोशन करतील. मराठी उद्योजकांचे मोठे संमेलन या निमित्ताने आयोजित करण्याचा संकल्प आहे.

ग्लोबल कोकण महोत्सवाची घोषणा आणि अभियानाचा प्रारंभ याच परिषदेत केला जाणार आहे. सर्व उद्योजकांनी आवर्जून उपस्थित राहायचे आहे.

संजय यादवराव
संस्थापक ग्लोबल कोकण
समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स
शिवस्वराज्य मराठी लोक चळवळ

स्टॉल बुकिंगसाठी गुगल फॉर्म*
https://docs.google.com/forms/d/1Mq3oEmKdiDaS3yx04iFMsdBNVmsJzrtv1W98zHdVa8M/edit

*स्टॉल बुकिंगसाठी संपर्क :* 90040 75995 / 7045374080 / 9082550774 /8779842009

स्थळ ः सी-११९, १ला मजला, रणजित स्टुडिओ कंपाऊंड, दादासाहेब फाळके रोड, दादर (पूर्व), मुंबई - १४

07/07/2025

कोकणात जागा विकू नका नाईलाजाने विकायचीच असेल तर कोकणी माणसांना किंवा मराठी यांना विका
व्यापक जनजागृती अभियान !

पुढील पंचवीस वर्षात कोकण हा जगातला एक प्रमुख प्रदेश बनेल. विकासाच्या प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्र केंद्रबिंदू असायला हवे...
22/01/2025

पुढील पंचवीस वर्षात कोकण हा जगातला एक प्रमुख प्रदेश बनेल. विकासाच्या प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्र केंद्रबिंदू असायला हवेत.
*अतिशय महत्त्वपूर्ण ग्लोबल कोकण उद्योग परिषद @ बी एन वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय, दादर, मंगळवार , दि. 4 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी ४ वाजता.*
कोकणचा कॅलिफोर्निया बनवूया असे केले अनेक वर्षे आपण ऐकतो. तसं काहीच करण्याची गरज नाही पण कॅलिफोर्निया आज जगात जितका महत्त्वाचा आहे तितका कोकण प्रदेश बनवूया असं म्हटलं पाहिजे.
आज कोकण कॅलिफोर्निया पेक्षा श्रीमंत आहे. इतिहास, लोककला कला संस्कृती सह्याद्री जैववैविधता निसर्ग, खाद्य, संस्कृती सर्वच विषयात कोकण कॅलिफोर्निया पेक्षा श्रीमंत आहे. एकाच गोष्टीची कमी आहे आर्थिक समृद्धीमध्ये कॅलिफोर्निया कोकणापेक्षा खूप पुढे आहे. पण पुढील 25 - 30 वर्षांमध्ये कोकण सुद्धा जगातला एक श्रीमंत प्रदेश बनणार आहे.
भारत ही एक जागतिक महासत्ता भविष्यात बनेल. भारताच्या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू मुंबई शहर आणि आता विस्तारित होणारी मुंबई म्हणजे कोकण आहे. जितका आर्थिक बलाढ्य भारत देश होईल तितकाच आर्थिक बलाढ्य कोकण प्रदेश होईल. याचे कारण मुंबई कोकणात आहे आणि कोकणातील भौगोलिक स्थिती.
आता विकसित झालेला अटल सेतू, पनवेल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ, अलिबाग विरार फ्रीवें, रिंग रोड, जेएनपीटी दिघी जयगड ही तीन मोठी बंदरे, दिघी औद्योगिक कॅरिडॉर, महाराष्ट्राच्या सर्वात प्रमुख एमआयडीसी कोकणात, रायगड पालघर मध्ये विस्तारित होणारी महामुंबई तिसरी मुंबई. खूप सार्‍या पायाभूत सुविधा येत्या 25 वर्षात कोकणात विकसित होणार आहेत आणि त्यामुळे कोकणातील तरुणांना कोकणात राहून विस्तारित महामुंबईमध्ये नोकऱ्या करता येतील उद्योग करता येतील आणि त्याचवेळी कोकणातील आपल्या जमिनीचा विकास करता येईल, पर्यटन शेती प्रक्रिया माशांची शेती असे निसर्ग पूरक उद्योग उभे करता येतील.
शिवस्वराज्य हे संघटित अभियान आपण गेली 25 वर्ष याच करता चालवत आहोत. आता ही चळवळ खूप मोठी होत आहे किंवा ती होणे ही काळाची गरज आहे. कोकणच्या विकासाच्या प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्रांचा सिंहाचा वाटा असला पाहिजे हा आमच्या चळवळीचा आग्रह आहे. एकूण कोकण विकासाच्या नियोजनात स्थानिक तज्ञ मान्यवर त्या त्या विषयातील यशस्वी उद्योजक यांना सहभागी करून घेतले पाहिजे आणि त्यासाठी स्वायत्त कोकण समितीची स्थापना केली पाहिजे ही आपली एक मुख्य मागणी आहे.
गेली दहा वर्ष म्हणजे एक दशक आपण ग्लोबल कोकण हा आंतरराष्ट्रीय महोत्सव मुंबईत आयोजित करतो. यावर्षी सहा ते नऊ मार्च, मुंबई एक्झिबिशन सेंटर, नेस्को गोरेगाव येथे अतिशय भव्य प्रमाणात ग्लोबल कोकण महोत्सव आयोजित केला आहे. यावेळी वरील विषय हा महोत्सवाचा मुख्य विषय असणार आहे.
याच महोत्सवाची पूर्वतयारी म्हणून भव्य ग्लोबल कोकण उद्योग परिषद राजा शिवाजी विद्यालय दादर येथे ४ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित केली आहे. सुदैवाने राज्याच्या मंत्रिमंडळात यावर्षी मोठ्या प्रमाणात कोकणातील मंत्री आहेत अनेक कार्यक्षम कोकणातील नेत्यांना मत्स्य उद्योग ,बंदरे, उद्योग, वने, फलोद्यान यासारखी कोकण विकास या विषयातील काय महत्वाची मंत्रिपदे मिळाली आहेत. या सर्व मान्यवरांना एका व्यासपीठावर आणून कोकणातील उद्योजकांच्या वतीने त्यांचा आपण भव्य सन्मान करणार आहोत.
याच परिषदेमध्ये कोकणातील अडचणी समस्या आव्हाने याचे सादरीकरण आपण मंत्रिमहोदयासमोर करून त्यांना निवेदन देणार आहोत आणि कोकणातील शेतकऱ्यांचे मच्छीमारांचे तरुणांचे प्रश्न सुटावेत यासाठी एक सातत्यपूर्ण पाठपुरावा आपण सुरू करत आहोत.
कोकणात प्रचंड वेगाने बदल होणार आहेत आणि या विकासाच्या प्रक्रियेत स्थानिक तरुणांनी शेतकऱ्यांनी सहभागी झाले पाहिजे आणि या विकासात स्थानिक भूमिपुत्रांचा मोठा सहभाग असला पाहिजे या दृष्टीने सातत्यपूर्ण चळवळ आणि अभियान आवश्यक आहे. या महत्वपूर्ण परिषदेमध्ये आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे .
*परिषद सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म 😘
https://docs.google.com/.../1FAIpQLSfzkrYX9d8.../viewform...
*संजय यादवराव*
संस्थापक ग्लोबल कोकण
शिवस्वराज्य एक लोकचळवळ
*आपल्या संघटनेचे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा* https://youtu.be/yW2CV_UqgfU
*समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अंतर्गत कोकण चेंबर ऑफ कॉमर्स मेंबर होण्याकरिता खालील वेबसाईटला क्लिक करा.*
www.samruddhamarathi.org
*kokan chamber of commerce - Global Kokan*
Office No. C Block 119, 1st Floor, Ranjit Studio Compound, Dadasaheb Phalke Road, Dadar (E), Mumbai - 400014.
*कार्यालय संपर्क 😘
8779842009/9082550774
विशेष सूचना
परिषद विनामूल्य आहे मात्र गुगल फॉर्म भरून नोंदणी आवश्यक आहे. प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य. थेट प्रवेश नाही
www.samruddhamarathi.org / www.globalkokan.org

पुढील पंचवीस वर्षात कोकण हा जगातला एक प्रमुख प्रदेश बनेल. विकासाच्या प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्र केंद्रबिंदू असायला हवे...
18/01/2025

*परिषद सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म :*
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfzkrYX9d8_owBvcHuKWhuGFoHNvKBcQ4XYtQUNq1kO6KOyJA/viewform?usp=sharing

*संजय यादवराव*
संस्थापक ग्लोबल कोकण
शिवस्वराज्य एक लोकचळवळ

*आपल्या संघटनेचे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा* https://youtu.be/yW2CV_UqgfU

*समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अंतर्गत कोकण चेंबर ऑफ कॉमर्स मेंबर होण्याकरिता खालील वेबसाईटला क्लिक करा.*
www.samruddhamarathi.org

*kokan chamber of commerce - Global Kokan*
Office No. C Block 119, 1st Floor, Ranjit Studio Compound, Dadasaheb Phalke Road, Dadar (E), Mumbai - 400014.

*कार्यालय संपर्क :-*
8779842009/9082550774

विशेष सूचना
परिषद विनामूल्य आहे मात्र गुगल फॉर्म भरून नोंदणी आवश्यक आहे. प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य. थेट प्रवेश नाही

www.samruddhamarathi.org / www.globalkokan.org

25/07/2024

कोकण! पन्नास वर्षांपूर्वी एका गावात शून्य माकडे व १००० माणसे होती. आज गावात 1000 माकडे व 200 माणसं राहतात.
अजून ५० वर्षांनी काय ?

समृद्ध कोकण लोकचळवळ आयोजित स्वराज्यभूमी आंदोलन. ( लेख पहिला )

ही परिस्थिती भयानक आहे. सर्वच म्हणतात कोणाचा विकास झाला पण गावागावात गावांचे वृद्धाश्रम झाले आहेत. शिमगा आणि गणपती सोडून आपण गावात गेलो तर अतिशय उदास वातावरण असते. गावातील वृद्ध माणसे एकत्र बसून गप्पा मारणे यापलीकडे गावात फारसे उपक्रम होताना दिसत नाहीत. गावावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी याचे आत्मपरीक्षण करायला हवे.

ही परिस्थिती का आली ?
कोकणात तरुण का राहत नाहीत ?
शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या का कमी झाली ?
कोकणातील शाळा हळूहळू का बंद होत आहेत ?
शेती 100% वरून दहा टक्क्यावर का आली ?
कोकणातील प्रत्येक गावात हजारो एकर जमिनी का विकल्या जात आहेत ?

गुजराती मारवाडी उत्तर भारतीय नेपाळी सर्वांनाच कोकणात रोजगार मिळत असताना आपल्यालाच कोकणात रोजगार का मिळत नाही ?
शिपाई ग्रामसेवक तलाठी कृषी सेवक आरोग्य सेवक कोकणातल्या नोकऱ्या कोकणातल्या तरुणांना का दिल्या जात नाहीत ?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावातील माणसांची संख्या वेगाने कमी होत असताना माकडांची लोकसंख्या प्रचंड वेगाने का वाढत आहे ? यावर नियंत्रण कोण आणणार ?

एक नाही असे असंख्य प्रश्न आज कोकणासमोर आहेत. वेळेत या प्रश्नांची उत्तरे आपण शोधली नाही तर आजपासून पन्नास वर्षांनी कोकणातील गावांमध्ये किती वर्ष राहतील आणि किती माकडे राहतील ?

आणि सर्वात महत्त्वाचे या वेगाने जमिनीची विक्री सुरू झाली तर कोकणातील गावे परप्रांतीयांची असतील आणि कोकणी माणूस भांडुप घाटकोपर कळवा दिवा नालासोपारा आणि बदलापूरच्या डोंगरावर राहत असेल.

मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कोकण चेंबर ऑफ कॉमर्स एक रचनात्मक गावागावात उद्योजकता विकासाची चळवळ राबवत आहे. कोकणात उद्योग गावागावात आणण्याबरोबरच मानसिकता बदलणे यावर विविध कोकण क्लबच्या शाखा आणि उद्योजकांची चेंबर काम करणार आहे.

दुसऱ्या बाजूने गेली 75 वर्ष शासकीय यंत्रणा कोकणावर अन्याय करत आहेत ज्यामुळे ही परिस्थिती कोपणात निर्माण झाली आहे. या शासकीय यंत्रणेचे विरोधात एक मोठा लढा उभारण्याची आपण ठरवले आहे याची सुरुवात या विधानसभेच्या निवडणुकीत आपण करणार आहोत.

कोकण जर समृद्ध करायचा असेल तर शेती बागायती पर्यटन आणि मत्स्य उद्योग या कोकणच्या मुख्य शक्ती स्थानांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि याकरता कोकणातील एक शेतकरी एक पर्यटन व्यवसायिक आणि एक मच्छीमार बांधव असे तीन त्या क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्राच्या विधानसभेत गेले पाहिजेत आणि 365 दिवस कोकणाचे प्रलंबित प्रश्न या विषयातील त्यांनी विधानसभेत मांडले पाहिजेत. अशी थेट भूमिका आपण घेत आहोत.

या विधानसभेच्या निवडणुकीत कोकणच्या विकासाच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होईल आणि याकरता स्वराज्य भूमी आंदोलन आपण सुरू करत आहोत.

या लोक चळवळीत आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरा.
क्रमशः

संजय यादवराव.
मुख्य समन्वयक
समृद्ध कोकण लोकचळवळ
स्वराज्यभूमी आंदोलन

#स्वराज्यभूमीआंदोलन #कोकणचिंतन #आम्हीचाकरमानी

10/12/2022

स्वाभिमानी कोकण! स्वावलंबी कोकण ! उद्योगी कोकण ! समृद्ध कोकण !
स्वराज्यभूमी कोकण महोत्सवात सहभागी झालेले उद्योजक,

उद्योजकाचे नाव - प्रथमेश शिंदे
उद्योग - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

अश्या विविध क्षेत्रातील उद्योगांना आणि त्याचे नाविन्य समजून घेण्यासाठी आजच स्वराज्याभूमी कोकण महोत्सवाला भेट द्या !!
शेवटचे २ दिवस- नेस्को सेंटर, गोरेगाव
अवश्य भेट द्या !

#स्वराज्यभूमी #भव्यस्वराज्यभूमीकोकणमहोत्सव #गौरवशालीइतिहास #गोरेगाव #स्वराज्यभूमीकोकण2022 #कोकण #मुंबई #निसर्गसंपन्न #परंपरा #संस्कृती #कला #लोककला #छत्रपतीशिवाजीमहाराज

Address

Office No. 25 & 26, Ajay Shopping Center, T. H. Kataria Marg, Matunga Road (West)
Mumbai
400016

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919930659799

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोकण भूमी प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to कोकण भूमी प्रतिष्ठान:

Share