Cinemawale

Cinemawale One place for New release news and Update of Movies / Drama/TV

15/05/2026

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री आलिया भट्टला सोशल मीडियावर ट्रोल करण्याचा प्रयत्न एका युजरला महागात पडला आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर आलियाकडे आंतरराष्ट्रीय पापाराझींनी दुर्लक्ष केल्याचा दावा करत एका ट्रोलरने तिला हिणवण्याचा प्रयत्न केला होता. यावर आलियाने अतिशय शांत पण 'सॅव्हेज' अंदाजात एका वाक्यात उत्तर देत ट्रोलरची बोलती बंद केली आहे

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘देश फाउंडेशन’तर्फे २०० हून अधिक बाल-कर्करोग योद्ध्यांसाठी ‘राजा शिवाजी’ नाटकाच...
15/05/2026

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘देश फाउंडेशन’तर्फे २०० हून अधिक बाल-कर्करोग योद्ध्यांसाठी ‘राजा शिवाजी’ नाटकाचा विशेष शो आयोजित करण्यात आला. चिमुकल्या योद्ध्यांसाठी आनंद, हास्य आणि प्रेरणेने भरलेला हा खास अनुभव अत्यंत हृदयस्पर्शी आणि अविस्मरणीय ठरला.

14/05/2026

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचा कान्समधील खास लूक

13/05/2026

पाच म्हणता म्हणता पंधरा गाणी करणार होते अवधूत गुप्ते पण...

avadhoot gupte songs story, marathi music industry, music production journey, viral entertainment news, marathi singer composer update

13/05/2026

रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिषेक बच्चनने छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू संभाजीराजे (संभाजी शहाजीराजे भोसले) ही भूमिका साकारली आहे. 'राजा शिवाजी'मध्ये अभिषेक बच्चनने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली. या सिनेमानंतर अभिनेत्याला शंभूराजे म्हणून चाहते हाक मारू लागले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चनने हा खास किस्सा सांगितला.

उर्वशी रौतेला नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. या फेस्टिव्हलमध्ये उर्वशीच्या ड्रेसने सर्वांचं लक्ष व...
13/05/2026

उर्वशी रौतेला नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. या फेस्टिव्हलमध्ये उर्वशीच्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधलं. उर्वशी रौतेलाच्या या सुंदर फॅशनने कान्समध्ये खऱ्या अर्थाने मैफिल लुटली आहे. उर्वशी रौतेलाच्या या ग्लॅमरस अदा पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

13/05/2026

बॉलिवूडची 'बार्बी गर्ल' आलिया भट नुकतीच 'कान्स'मध्ये सहभागी झाली आहे. कान्समधला तिचा पहिला लूकही व्हायरल झाला आहे. ब्लश पिंक रंगाच्या ऑफ शोल्डर डीप नेक गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसली. आलिया रेड कार्पेटवर फोटोग्राफर्ससमोर पोज देण्यासाठी सज्ज असताना तिला मात्र फार कोणी ओळखलंच नाही. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कान्सच्या ओपनिंग नाईटला आलिया भटचा जलवा बघायला मिळाला. तिच्या सौंदर्याचं आणि एकूणच लूकचं भारतीयांनी तर खूप कौतुक केलं. ब्लश पिंक गाऊन, ग्लॅम मेकअप, मेस्सी हेअरस्टाईल आणि चकाकणारी ज्वेलरी या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. ती आत्मविश्वासाने रेड कार्पेटवर आली आणि सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जाईल अशीच अपेक्षा होती. तिने सगळ्यांना हात केला, फ्लाइंग किस दिली आणि कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या. मात्र नेटकऱ्यांचं लक्ष फोटोग्राफर्सकडे गेलं. एकही फोटोग्राफर तिचे फोटो काढत नसून सगळ्यांचं लक्ष भलतीकडेच आहे असं दिसत आहे. आलियाला कोणीच ओळखलं नाही अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

13/05/2026

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटही याही वर्षी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाली आहे. कान्समधील तिच्या लूक्स कडे चाहत्यांचं विशेष लक्ष लागलं आहे. दरम्यान आलियाचा पहिला लूक इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. प्रिन्सेस स्टाईल गाऊनमध्ये आलिया जणू परीच दिसत आहे. तयार होऊन बाहेर पडतानाचा तिचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

12/05/2026

स्ट्रगलरच्या आयुष्यातले महत्वाचे तीन F

struggler life motivation, 3f of life, friends family future quote, youth struggle journey, inspirational marathi content

12/05/2026

शिवराळ भाषेवर बोट ठेवणाऱ्यांना लेखक दिग्दर्शक विजू मानेंचे स्पष्ट उत्तर

viju mane statement viral, marathi cinema language debate, struggler saala controversy, filmmaker response criticism, social media discussion marathi

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cinemawale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Cinemawale:

Share