आजोबा ताता गणपती

आजोबा ताता गणपती श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेश?

27/08/2026

26/08/2026
25/08/2026

*श्री आजोबा ताता गणपती मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण गाजूल यांची सर्वानुमते निवड*

🌏 https://www.md24news.co.in/2026/08/blog-post_907.html

श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,क्रांती चौक, कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगर कुंभारी.मंडळाच्या अध्यक्षपदी श्र...
25/08/2026

श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,क्रांती चौक, कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगर कुंभारी.मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. अरुण गाजूल यांची निवड

सोलापूर: श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (वर्ष २०२६-२७) च्या पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या आगामी वर्षासाठी मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. अरुण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

तसेच मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्री. अमर रच्चा, खजिनदारपदी श्री. अशोक माचन तर सचिवपदी श्री. मधुकर गाजूल यांची निवड झाली आहे.

उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात उत्सव साजरा करणार नवीन कार्यकारिणीच्या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. अरुण व इतर पदाधिकाऱ्यांचे मंडळाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ सदस्य आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन व पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्षांनी सांगितले की, "मंडळाची परंपरा कायम राखत आगामी गणेशोत्सव अत्यंत दिमाखात, धार्मिक भाविक वातावरणात, सामाजिक उपक्रमांची जोड देऊन आणि सर्व नियमांचे पालन करून साजरा केला जाईल." मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सोपवलेली ही जबाबदारी आपण सर्वांच्या सहकार्याने पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास मंडळाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नवीन कार्यकारिणीला भावी वाटचालीसाठी व आगामी उत्सवासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

25/08/2026
*सन डेव्हलपर्सच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप*🌏
25/08/2026

*सन डेव्हलपर्सच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप*

🌏

ईद-ए-मिलाद-उन-नबी शांतता,शिस्त आणि बंधुभावाने साजरी करा : महाराष्ट्र राज्य…

सन डेव्हलपर्सच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप; सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संद...
25/08/2026

सन डेव्हलपर्सच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप; सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश
https://dhunt.in/15cIf8

By महाराष्ट्र जनभूमी via Dailyhunt

कुंभारी (सोलापूर ): व्यवसायात यश मिळवण्याबरोबरच समाजाप्रती असलेली आपली जबाबदारीही तितक्याच प्रामाणिकपणे जपली प.....

सन डेव्हलपर्सच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप; सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संद...
07/08/2026

सन डेव्हलपर्सच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप; सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश

कुंभारी (प्रतिनिधी):
व्यवसायात यश मिळवण्याबरोबरच समाजाप्रती असलेली आपली जबाबदारीही तितक्याच प्रामाणिकपणे जपली पाहिजे, या उदात्त भावनेतून सन डेव्हलपर्सच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त श्री आजोबा ताता गणपती मंडळ, क्रांती चौक, कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगर, कुंभारी यांच्या वतीने अत्यंत हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच ज्यांचे आई किंवा वडील निधन पावले आहेत अशा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी श्री आजोबा ताता गणपती मंदिर परिसर, क्रांती चौक, कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगर (खडी मशीन मागे), कुंभारी येथे हा उपक्रम उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या हातात नवीन वह्या देताना त्यांच्या डोळ्यांतील आनंद, चेहऱ्यावरील समाधान आणि उज्ज्वल भविष्यासाठी उमटलेली आशेची किरणे उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेली.

यावेळी सन डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा भुमेश यनगंदुल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी शिक्षण हेच जीवनातील सर्वात मोठे सामर्थ्य असून, कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हीच या उपक्रमामागील प्रेरणा असल्याचे सांगितले.

हा उपक्रम केवळ वह्यांचे वाटप नसून, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्याचा, त्यांच्या शिक्षण प्रवासात आशेचा हात देण्याचा आणि समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने गरजूंसाठी पुढे यावे, असा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री आजोबा ताता गणपती मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी मनापासून परिश्रम घेतले. त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे परिसरातील नागरिकांनी मनापासून कौतुक केले. सन डेव्हलपर्स आणि मंडळाने समाजसेवेचा घेतलेला हा वसा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, भविष्यातही अशाच समाजहिताच्या उपक्रमांद्वारे समाजाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Address

क्रांती चौक, कॉ गोदुताई नगर, कुंभारी, सोलापूर
Kumbhari
413006

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आजोबा ताता गणपती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category