28/03/2026
यंदाच्या गुढीपाडव्याला आपल्या श्रीराम सेवा मंडळातर्फे हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत एक मंच उभारला होता. त्या मंचावरून येणाऱ्या प्रत्येक चित्ररथाचे स्वागत केले गेले. त्याच प्रमाणे बऱ्याच मान्यवरांचे स्वागत देखील या ठिकाणी केले गेले. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त, स्थानिक नगरसेवक, इत्यादी मान्यवरांचे स्वागत मंडळातर्फे केले गेले.