कळस कृषी प्रदर्शन - Kalas Agri Expo

  • Home
  • India
  • Kalas
  • कळस कृषी प्रदर्शन - Kalas Agri Expo

कळस कृषी प्रदर्शन - Kalas Agri Expo अधिक माहितीसाठी संपर्क - सागर वाकचौरे
मो. नं - 8108812020

21/08/2026

भारतातील ग्रामीण भागातील सर्वात मोठा "महाकुंभ"

कळस कृषी व डेअरी प्रदर्शन संगमनेर आयोजित
" शेतकरी महाकुंभ "
23 ते 29 जानेवारी 2027

🐄🐃 राज्यस्तरीय संकरीत गाय व म्हैस दुग्ध व सौदर्य स्पर्धा
🌱400 पेक्षा जास्त पिकांचे पीक प्रात्यक्षिक प्रदर्शन

ग्रेट डेअरी फार्म भेट

सिन्नर तालुक्यातील दूध उद्योजक ब्रीडर -विशाल पोमनर नावांच्या ध्येयवेड्या युवकाने शेळीपालन, संकरीत गायपालन, म्हैसपालन यासारख्या वेगवेगळ्या जातीचे पशुपालन करून भविष्यातील डेअरी व्यवसायातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तज्ञांच्या सल्याने ब्रिडिंग वरती काम करून शाश्वत दुग्धव्यवसायाचे आदर्श मॉडेल उभे केले आहे

अभिनंदन विशाल भाऊ
शेतकरी महाकुंभ 2027
संपर्क 081088 12020

20/08/2026

नागपूरच्या शिष्टमंडळाकडून संगमनेर व अकोले येथील दुग्ध व्यवसायाची पाहणी!

काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे धडाडीचे सभापती मा. दिनेशभाऊ ठाकरे यांनी आपल्या शिष्टमंडळासह संगमनेर आणि अकोले तालुक्यातील दूध उद्योजक ब्रीडर विजय पानसरे (रायते), दूध उद्योजक ब्रीडर विलास उंबरकर निमगावजाळी, दूध उद्योजक ब्रीडर प्रकाश बिबवे यांच्या डेअरी फार्मला प्रत्यक्ष भेट दिली.
या दौऱ्यादरम्यान शिष्टमंडळाने परिसरातील विविध आधुनिक गोठ्यांना भेटी देऊन पशुपालकांशी थेट संवाद साधला आणि खालील प्रमुख बाबींची सखोल माहिती घेतली:

* 🌾 मुरघास व भुसा व्यवस्थापन: चाऱ्याचे उत्कृष्ट नियोजन.
* 🐄 मुक्त संचार गोठा: जनावरांचे आरोग्य आणि कष्टांची बचत करणारी पद्धत.
* 🍼 कालवड संगोपन: भविष्यातील उत्तम दुग्धोत्पादनाची पायाभरणी.
* ⚙️ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: दूध व्यवसायातील डिजिटलायझेशन आणि ऑटोमेशन.

विदर्भातील शेती आणि पूरक व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी दिनेशभाऊंनी घेतलेला हा पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे.

संगमनेर-अकोले परिसरातील दूध उद्योजकांच्या कष्टांची आणि प्रगतीची दखल घेतल्याबद्दल दिनेशभाऊ ठाकरे व त्यांच्या संपूर्ण शिष्टमंडळाचे मनःपूर्वक आभार! 💐

जय्यत तयारी सुरू कळस कृषी व डेअरी प्रदर्शन संगमनेरआयोजित "शेतकरी महाकुंभ"23 ते 29 जानेवारी 2027🌱 पीक प्रात्यक्षिक प्रदर्...
19/08/2026

जय्यत तयारी सुरू

कळस कृषी व डेअरी प्रदर्शन संगमनेरआयोजित
"शेतकरी महाकुंभ"
23 ते 29 जानेवारी 2027

🌱 पीक प्रात्यक्षिक प्रदर्शन
🐄🐃राज्यस्तरीय संकरीत गाय व म्हैस दुग्ध व सौदर्य स्पर्धा

ग्रेट भेट

ग्रामीण भागातील रिअल हिरो

महाराष्ट्र पोलिस मुंबई व नाशिक येथे सेवेत असणारे

दूध उद्योजक ब्रीडर फार्मर- संजय सुभाष आव्हाड
दूध उद्योजक ब्रीडर फार्मर- बाळासाहेब सुभाष आव्हाड

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील 'पास्ते' गावचे रहिवासी असलेले आव्हाड बंधू महाराष्ट्र पोलीस दलात (मुंबई व नाशिक येथे) कार्यरत आहेत.
देशाची आणि राज्याची सुरक्षा सांभाळतानाच, त्यांनी आपल्या मातीशी असलेली नाळ तुटू दिली नाही.
आज त्यांच्या आधुनिक गोठ्यात एकूण २६ गाई असून, योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर ते २४ तासांत सरासरी २४५ लीटर दुधाचे उत्पादन घेत आहेत.
अनेक तरुण आज झटपट श्रीमंत होण्याच्या मागे धावत असताना, आव्हाड बंधूंनी मात्र शाश्वत प्रगतीचा आणि आधुनिकतेचा मार्ग निवडला.

पोलीस सेवेच्या व्यस्त वेळापत्रकातून दोन्ही बंधूंनी आपल्या पत्नींना आई-वडिलांच्या सेवेसाठी आणि गोठ्याच्या व्यवस्थापनासाठी गावात ठेवले आहे.
प्रत्येक सुट्टीला गावी आल्यावर, कुठलाही संकोच न बाळगता हे दोन्ही भाऊ गोठ्यातील शेण काढण्यापासून ते धार काढण्यापर्यंत सर्व कामे आपल्या पत्नीच्या साथीने आनंदाने करतात.

भविष्याचा अचूक वेध घेत त्यांनी गाईंच्या उत्तम पैदाशीवर (Breeding) लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे दुधाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही वाढले आहे.
आव्हाड बंधूंचे काम बघून अतिशय अभिमान व

महाराष्ट्र पोलिस आव्हाड बंधूंचे मनःपुर्वक आभार व त्यांच्या कार्यास सलाम !

महाराष्ट्र आता ब्रीडिंग मध्ये घेतोय भरारी...

शेतकरी महाकुंभ जानेवारी 8108812020

जय्यत तयारी सुरू कळस कृषी व डेअरी प्रदर्शन संगमनेर आयोजित "शेतकरी महाकुंभ"23 ते 29 जानेवारी 2027🐄राज्यस्तरीय संकरीत गाय ...
18/08/2026

जय्यत तयारी सुरू

कळस कृषी व डेअरी प्रदर्शन संगमनेर आयोजित
"शेतकरी महाकुंभ"
23 ते 29 जानेवारी 2027

🐄राज्यस्तरीय संकरीत गाय दुग्ध व सौदर्य स्पर्धा
🐃 राज्यस्तरिय म्हैस दुग्ध व सौदर्य स्पर्धा

ग्रेट भेट

ग्रामीण भागातील रिअल हिरो
दूध उद्योजक ब्रीडर फार्मर- स्वप्नील आंत्रे
वावी ता. सिन्नर जि. नाशिक
सभापती मा. कृष्णा भाऊ भुमरे
कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर

एकूण गाईंची संख्या-30
दुधाळ गाई - 14
एकूण दुध 24 तासात - 235 लिटर

वावी सारख्या दुष्काळी परिसरात स्वतः ची जिद्द व प्रचंड महत्वकांशेच्या जोरावर फक्त मुरघास आणि गव्हाच्या भुसाचे योग्य नियोजन करून स्वप्नील भाऊंनी ब्रिडिंग वरती योग्य काम केले व उत्तम पद्धतीने कालवड संगोपन केले आहे.

अभिनंदन स्वप्नील भाऊं💐

महाराष्ट्र आता ब्रीडिंग मध्ये घेतोय भरारी..
Preparations are in full swing!

Organized by Kalas Agriculture & Dairy Exhibition Sangamner,
presents
"Shetkari Mahakumbh" (Farmers' Mega Gathering)

23rd to 29th January 2027

🐄 State-Level Hybrid Cow Milk & Beauty Competition
🐃 State-Level Buffalo Milk & Beauty Competition

A Great Meetup

Real Hero of the Rural Area

Dairy Entrepreneur & Breeder Farmer - Swapnil Antre
Vavi, Taluka: Sinnar, District: Nashik

Chairman Hon. Krishna Bhau Bhumre
Agricultural Produce Market Committee (APMC), Sinnar

* Total Number of Cows: 30
* Milking Cows: 14
* Total Milk Yield in 24 Hours: 235 Litres

In a drought-prone area like Vavi, driven by sheer determination and immense ambition, Swapnil Bhau worked

exceptionally well on cattle breeding and calf rearing. He achieved this through the perfect management and balance of silage (Murghas) and wheat bran (Bhusa).
Heartiest

Congratulations, Swapnil Bhau! 💐

Maharashtra is now taking a massive leap in cattle breeding...
For more details,

contact: 081088 12020

जय्यत तयारी सुरू कळस कृषी व डेअरी प्रदर्शन संगमनेर आयोजित महाराष्ट्रातील पहिलीच म्हैस दुग्ध व सौदर्य स्पर्धा23 ते 29 जान...
17/08/2026

जय्यत तयारी सुरू
कळस कृषी व डेअरी प्रदर्शन संगमनेर आयोजित

महाराष्ट्रातील पहिलीच म्हैस दुग्ध व सौदर्य स्पर्धा
23 ते 29 जानेवारी 2027

ग्रेट भेट
अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यातील पहिला म्हैस पशुपालक ब्रीडर

दूध उद्योजक ब्रीडर - मा. विशाल पोमनर
हिवरगाव ता. सिन्नर, नाशिक

विशाल भाऊंच्या गोठ्यात पहिल्या जनरेशन मध्ये जन्माला आलेली अतिशय उत्तम संगोपन झालेली 13 महिन्याची बायफ संजू बुलची मुऱ्हा जातीची पारडी
भाऊच्या गोठ्यात 2 मुऱ्हा व 2 जाफराबादी जातीच्या पहिल्या जनरेशनच्या पारड्या जन्मलेल्या आहे

सर्व जनावरे मुक्त संचार गोठ्या मधे उत्तम संगोपन करून मुरघास व भुष्याचे योग्य नियोजन करून मिल्किंग मशीन द्वारे प्रति म्हैस सरासरी 18 ते 19 लिटर दूध काढतात बघून अतिशय आनंद वाटला

महाराष्ट्राची शान विशाल भाऊंच्या म्हैस ब्रिडिंग वरील उत्तम कार्यास सर्व दूध उद्योजकांचा सलाम

जय्यत तयारी सुरू कळस कृषी व डेअरी प्रदर्शन आयोजित शेतकरी महाकुंभ 23 ते 29जानेवारी 2027राज्यस्तरीय संकरीत गाय दुग्ध व सौद...
15/08/2026

जय्यत तयारी सुरू
कळस कृषी व डेअरी प्रदर्शन आयोजित शेतकरी महाकुंभ 23 ते 29जानेवारी 2027
राज्यस्तरीय संकरीत गाय दुग्ध व सौदर्य स्पर्धा

ग्रेट भेट

ग्रामीण भागातील रिअल हिरो
दूध उद्योजक ब्रीडर फार्मर- अनिल घुगे
निमोण ता. संगमनेर जि. अहिल्यानगर

एकूण गाईंची संख्या-35
दुधाळ गाई - 12
एकूण दुध 24 तासात - 230 लिटर

भविष्यातील ब्रेडिंगचे महत्व ओळखून भाऊंनी ब्रिडिंग वरती काम करून उत्तम पद्धतीने कालवड संगोपन चालू केले

महाराष्ट्र आता ब्रीडिंग मध्ये घेतोय भरारी...

भविष्यातील शेती व डेअरी तंत्रज्ञानाचा भारतातील ग्रामीण भागातील सर्वात मोठा आणि महाराष्ट्रातील पहिलाच अभूतपूर्व सोहळा... ...
09/08/2026

भविष्यातील शेती व डेअरी तंत्रज्ञानाचा भारतातील ग्रामीण भागातील सर्वात मोठा आणि महाराष्ट्रातील पहिलाच अभूतपूर्व सोहळा...

कळस कृषी व डेअरी प्रदर्शन आयोजित"शेतकरी महाकुंभ"

🗓️ दिनांक १४ ते २० जानेवारी २०२७

प्रदर्शनाची मुख्य वैशिष्ट्ये
🌱 पीक प्रात्यक्षिक प्रदर्शन (Live Demo Plots) आधुनिक शेतीचे थेट दर्शन!

🐄 राज्यस्तरीय संकरीत गाय दुग्ध व सौंदर्य स्पर्धा

🐃 महाराष्ट्रातील पहिली म्हैस दुग्ध व सौंदर्य स्पर्धा

👨🏻‍🎓नॅशनल एज्युकेशन एक्स्पो

🙍🏻‍♀️वूमन बिजनेस एक्स्पो

🎯 कंपन्या आणि व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी
लाखो प्रगतीशील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून आपला व्यवसाय वाढवा!

📍स्थळ नाशिक-पुणे हायवे,
संगमनेर (शिर्डी) जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र.

📌 डेमो प्लॉट व स्टॉल बुकिंग सुरू !
📞 संपर्क 8108812020 8208562523 962329157

India’s largest rural and Maharashtra’s first-ever unprecedented grand event on future agriculture and dairy technology...

"Shetkari Mahakumbh"
Organized by Kalas Agriculture & Dairy Exhibition

🗓️ Date: 14th to 20th January 2027

------------------------------
# # 🌟 Key Highlights of the Exhibition

* 🌱 Live Crop Demonstration Plots: Experience the future of modern farming firsthand!
* 🐄 State-Level Hybrid Cow Milk & Beauty Competition
* 🐃 Maharashtra’s First-Ever Buffalo Milk & Beauty Competition
* 👨🏻‍🎓 National Education Expo
* 🙍🏻‍♀️ Women's Business Expo

------------------------------
# # 🎯 Golden Opportunity for Companies and Businesses

* Grow your business by interacting directly with lakhs of progressive farmers!

📍 Venue Nashik-Pune Highway, Sangamner (Shirdi), District - Ahilyanagar, Maharashtra.

------------------------------
# # 📌 Demo Plot & Stall Bookings Open!
📞 Contact: 8108812020 8208562523 9623291571

महाराष्ट्रातील पशुपालकांसाठी आनंदाची बातमी शासन आदेश मिळवण्यासाठी 081088 12020  या नंबर वरती तुमची माहिती पाठवा
07/08/2026

महाराष्ट्रातील पशुपालकांसाठी आनंदाची बातमी

शासन आदेश मिळवण्यासाठी 081088 12020 या नंबर वरती तुमची माहिती पाठवा

Address

Kalas
422601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कळस कृषी प्रदर्शन - Kalas Agri Expo posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share