Malhar Help Fair

Malhar Help Fair पहिल्यांदाच दाते’ आणि याचक’ एकाच छताखाली एकाच व्यासपीठावर !

व्यक्ती कुणीही असो, जगण्याचा संघर्ष ओघानं आलाच... या संघर्षाची तीव्रता कमी करण्यासाठी, माणसाला तगण्यातून जगण्याकडे’ नेण्यासाठी मदतीचा हात हा आवश्यक असतो. सब समाज को लिये साथ में आगे है बढते जाना।’ या उक्तीनुसार समाजातील उपेक्षीत, तळागाळातील वंचितांच्या उत्कर्षासाठी आपल्या भोवतालच्या विविध संस्था निस्पृह भावनेने अपार कष्ट करीत असतात. त्या संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्याचं काम हेल्प-फेअरच्या मा

ध्यमातून जळगाव नगरीत होणार आहे. माणसाच्या आर्थिक, मानसिक जडण घडणीच्या दृष्टीने उचललेले हे दमदार पाऊल होय.

हेल्प-फेअर हा उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाकांक्षी, वैशिष्ट्यपूर्ण आणि कल्पक उपक्रम 19 ते 21 जानेवारी 2018 दरम्याने शहरातील सागर पार्क मैदानावर आयोजला आहे. यामध्ये समाजोत्थानासाठी आत्मियतेने मदतीचे कार्य करणार्या व्यक्ती, समाजिक संस्था, एनजीओ, क़ॉर्पोरेटस् आणि सहकारी संस्था यांच्या कार्याचा जवळून परिचय होईल. व्यक्तिच्या समृद्दीसाठी अखंड वाटचाल करणार्या सेवाभावी संस्था, दानशूर दाते’ आणि मदतीची अपेक्षा बाळगणारे याचक’ यांना परस्पर पूरक ठरणारे, महत्त्वाचे दुवा जोडण्याचे काम या फेअरच्या माध्यमातून प्रभावीपणे होईत यात तीळमात्र शंका नाही.

पहिल्यांदाच दाते’ आणि याचक’ एकाच छताखाली एकाच व्यासपीठावर मल्हारच्या हेल्प गाईडचे प्रकाशन सेवामहर्षिंच्या अनुभवाचे बोल त्यांच्याच तोंडून.. उत्तर महाराष्ट्रात प्रथमच...

Another proud moment for the Malhar Help Fair team… We helped Jalgaon’s sanitation workers by honouring them with ‘Arogy...
05/04/2025

Another proud moment for the Malhar Help Fair team… We helped Jalgaon’s sanitation workers by honouring them with ‘ArogyaDoot Award 24’ for their contribution & hard work to keep our city clean & healthy! We motivated them today. They keep serving for a better tomorrow!

२०२३-२०२४ चे आरोग्यदूत पुरस्कार जाहीर मल्हार च्या लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन द्वारे हेल्प फेअर अंतर्गत दरवर्षी देण्यात य...
04/04/2025

२०२३-२०२४ चे आरोग्यदूत पुरस्कार जाहीर

मल्हार च्या लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन द्वारे हेल्प फेअर अंतर्गत दरवर्षी देण्यात येणाऱ्या आरोग्यदूत पुरस्कारांची नावे नुकतीच जाहीर झाली असून या वर्षी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत उमेश बेंडवाल, गौतम सोये, सोनू चिरवडे, सुंदराबाई आहिरे, दीपाली भालेराव, बबलू गायकवाड.

या पुरस्कारांतर्गत एक स्मृतिचिन्ह व रु. ५००० चे रोख पारितोषिक दिले जाते. सोबतच प्रत्येक पुरस्कारार्थी ची चित्रफीत बनवून ती कार्यक्रमात दाखविली जाते. या वर्षीचा आरोग्यदूत पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. ४ एप्रिल २०२५ रोजी, सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन) येथे स. १२ ते दु १ या वेळेत जळगाव शहर महानगरपालिका आणि ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट घेत असलेल्या कार्यक्रमात होणार आहे.

या पुरस्कारासाठी महानगरपालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांच्या कार्याचे वर्षभर अवलोकन करून त्यातून पुरस्कारार्थी ठरवले जातात. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने ही निवड केली जाते. दरवर्षी या पुरस्कारासाठी कार्यक्रमाचे नियोजन मल्हार कम्युनिकेशन्स, जळगांव करीत असते. आरोग्यदूत पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी दरवर्षी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक श्री. सिद्धार्थ बाफना यांचे मार्गदर्शन लाभते.

यावर्षी पुरस्कारासोबतच सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्नेहभोजन ही देण्यात येणार असून महानगरपालिकेच्या प्रत्येक कायम स्वच्छता कर्मचाऱ्याला त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एक सन्मानपत्र वितरित करण्यात येणार आहे. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी मल्हार कम्युनिकेशन्स चे शाम पवार, कृष्णा भोई, साजिद खान, चारुदत्त मल्हारा, निखिल शिंदे आदींनी परिश्रम घेतल्याचे हेल्प फेअर टीमचे सदस्य भरत अमळकर, प्रकाश चौबे, गनी मेमन, नंदू अडवाणी, अमर कुकरेजा, चंद्रशेखर नेवे, प्रशांत मल्हारा व आनंद मल्हारा यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

Address

Sagar Park
Jalgaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malhar Help Fair posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Malhar Help Fair:

Share

Category