19/05/2025
TAROT READING.
टॅरोट रिडिंग म्हणजे काय?
Cards च्या माध्यमातून सांकेतिक सूचक अशा पद्धतीने मागितले गेलेले मार्गदर्शन म्हणजे Tarot Reading.
भविष्य कथन करण्यापेक्षा TAROT उत्तम भविष्य घडवता यावं यासाठी मार्गदर्शन करते. कर्माच्या फळापेक्षा उत्तम कर्म कसं करता येईल त्यासाठी सहाय्य करते.
मध्ययुगीन काळात युरोप मधे TAROT READING ही संकल्पना वापरली गेली. या विश्वाला भविष्य कथन ही संकल्पना भारतातून मिळाली असं म्हणतात.आपल्या आयुष्यात काही महत्वाचे निर्णय घेताना जसं आपण ज्योतिषशास्त्र याचा आधार घेतो तसचं आपल्याला योग्य तो निर्णय घ्यायला मदत व्हावी मार्गदर्शन मिळावं या हेतूने इटली मधे Tarot reading या पद्धतीचा अधिक वापर केला गेला. या मधे आपल्याला कार्ड्स द्वारे सांकेतिक सूचक अशा चित्रांच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन मिळवता येते.
आपण स्पष्ट प्रश्न विचारला असता ' आपल्याला आपल्या या Situation जे जाणून घेण्याची गरज आहे त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन TAROT READING मधून मिळू शकते.'
आपलं ध्येय गाठण्यासाठी आपण नेमकं काय करावं? नेमकं काय टाळावं ? हे असे प्रश्न आपल्याला रोज पडत असतात यासाठी आपल्याला TAROT READING मधून मार्गदर्शन मिळू शकतं.
रोज आपण सर्वच वेगवेगळ्या प्रकारे पण भावनिक,आर्थिक,वैचारिक आणि निर्णय घेण्याच्या स्थिती यासारखी द्वंद्व सतत अनुभवत असतो.त्यामध्ये नेमकं काय करू? यासाठी TAROT READING आपल्याला मदत करतं.
इथे मुख्य गोष्ट ही आहे की हे फक्त sharing किंवा कुणाचीही वैयक्तिक मत यातून हे मार्गदर्शन मिळणार नसतं तर आपल्याहून मोठी एक शक्ती आहे Universe तिच्याकडून सांकेतिक पद्धतीने हे मार्गदर्शन मिळणार असते. त्यामुळे जे आवश्यक आहे तेच इथे आपल्याला समजू शकते.ना कुणाचं लेक्चर ना कुणाचं judgement.
कारण आपले निर्णय आपलं भविष्य घडवत असतात. त्यामुळे आपण आपलं कर्म, आपले निर्णय योग्य कसे घेऊ शकू यासाठी Tarot कडून मनोभावे मार्गदर्शन मागितल्यावर आपल्याला उत्तरं नक्कीच मिळतात.
Tarot मधे तुमची प्रश्न विचारण्याची इच्छा आणि विश्वास खूप मोलाचं काम करतात.यामधे तुमची ऊर्जा तुम्ही स्विकाराच्या आणि विश्वासाच्या स्थितीत असणं खूप महत्त्वाचं असतं.
एखाद्याने आपल्याकडे मार्गदर्शन मागताना ज्या स्थितीत असावं असं आपल्याला वाटतं त्याचं विश्वासाने Universe कडून मार्गदर्शन आपण मागू शकतो आणि आपल्याला ते मिळू शकतं. आणि आपण आपले निर्णय अजून उत्तम रित्या घेऊ शकतो.त्या साठी TAROT GUIDANCE खूप उपयुक्त आहे.
TAROT WITH YUGAA.
Your Questions Our Answers ✨😇
Book your reading session today. 😊😊
DM- Yugaa Sawant
Mrs.Yugaa Sawant Kadam
What's app -9820229652