07/08/2024
*तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा......*
*पश्चात्ताप* भूतकाळ बदलू शकत नाही आणि *काळजी* भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच *वर्तमानाचा* आनंद घेणे हेच जीवनाचे *खरे सुख* आहे. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून, आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते.
ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याला अजूनही नोकरी नाही.
*कृतज्ञ रहा*.
ज्या कामातुन देवाने तुमच्यासाठी सर्व दिले, तेच काम इतर लोक करत आहेत पण अनेकांना तुमच्या एवढे यश मिळालेले नाही.
*कृतज्ञ रहा*.
तुम्ही रोज जो रस्ता वापरुन घरी सुरक्षित पोहचता तोच रस्ता वापरताना तिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावलेत.
*कृतज्ञ रहा*.
ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचे जीवनात तुमच्यापेक्षा जास्त दु:ख आहे.
*कृतज्ञ रहा*.
हॉस्पिटलमध्ये वापरलेल्या ज्या बेड वर तुम्ही बरे झालात आणि तुम्हाला डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
*कृतज्ञ रहा*.
ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले, त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उध्वस्त केले.
*कृतज्ञ रहा*.
कृतज्ञ रहा कारण तुमच्याकडे जे काही आहे ती फक्त
*"ईश्वरी कृपा"* आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे.
*म्हणुनच*
हा असं वागला , तो तसं वागला , कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा . आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा . त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.
*वय* आणि *पैसा* यावर कधीच *गर्व* करू नये. कारण ज्या गोष्टी *मोजल्या* जातात, त्या नक्कीच *संपतात*. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याच नाव आहे *आत्मविश्वास*. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर *तुम्ही चांगले* आहात म्हणून.
*नेहमी आनंदी रहा. खुश रहा सकारात्मक रहा*