Mahesh Dada Sports Foundation #MDSF

Mahesh Dada Sports Foundation #MDSF That place for young and small kids for growth our Indian sports .

अभिमान पिंपरी-चिंचवडकरांचा..! नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशन - दिघीची राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती “शांभवी अंजली बजरंग मोळक” ह...
07/01/2026

अभिमान पिंपरी-चिंचवडकरांचा..!

नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशन - दिघीची राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती “शांभवी अंजली बजरंग मोळक” हिने दिव घोगला बिच येथे झालेल्या “खेलो इंडिया बिच गेम्स” मधे रोप आणि पोल मल्लखांब स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल तीचे व संपूर्ण महाराष्ट्र टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन…! तसेच शंभुला पुढ़िल वाटचालीस भव्य शुभेच्छा…!

अर्जुन एरिगाईसीची प्रेरणादायी कामगिरी♟️🥉दोहा येथील FIDE वर्ल्ड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल अर्जुन ...
01/01/2026

अर्जुन एरिगाईसीची प्रेरणादायी कामगिरी♟️🥉
दोहा येथील FIDE वर्ल्ड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगाईसीचे हार्दिक अभिनंदन, FIDE रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
अर्जुन, तुझी चपलख प्रतिभा आणि खेळाबद्दलची आवड देशाला अभिमानास्पद आहे. तुझ्या बुद्धिबळ प्रवासात तू आणखी उंच शिखरे गाठत असताना तुला यश आणि अनेक टप्पे गाठण्याची शुभेच्छा!

🇮🇳 भारत पुन्हा विश्वविजेता! 🏆८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताने ७व्या रोल बॉल महिला विश्वचषक २०२५ मध्ये सुवर्णपदक पटकावत...
24/12/2025

🇮🇳 भारत पुन्हा विश्वविजेता! 🏆

८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताने ७व्या रोल बॉल महिला विश्वचषक २०२५ मध्ये सुवर्णपदक पटकावत २०१७ नंतर पुन्हा एकदा जागतिक विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.

विश्वाविजेत्या भारतीय संघात आपल्या पिंपरी-चिंचवडची कन्या सुहानी सिंह हिने कौतुकास्पद कामगिरी केली असून शहराचे नाव उंचावले आहे...

अभिमानास्पद यशाबद्दल संपूर्ण संघाचे, प्रशिक्षकांचे आणि सहायक कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

जय हिंद!

अभिमानास्पद क्षणआमचे मित्र शानुप नायर यांची कन्या किश्का नायर, City Pride School, Ravet येथे शिक्षण घेत असताना Falcons A...
16/12/2025

अभिमानास्पद क्षण

आमचे मित्र शानुप नायर यांची कन्या किश्का नायर, City Pride School, Ravet येथे शिक्षण घेत असताना Falcons Academy व Aspire India या नामांकित संस्थांसाठी प्रतिनिधित्व करत आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘Project Mahadeva’ अंतर्गत पाच वर्षांच्या निवासी शिष्यवृत्ती आधारित फुटबॉल विकास कार्यक्रमासाठी
किश्काची निवड झाल्याबद्दल, तीचे तिच्या पालकांचे व प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन..!
जागतिक फुटबॉलमधील महान खेळाडू लिओनेल मेस्सी यांची भेट मिळणे, हे किश्काच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे, कठोर शिस्तीचे आणि अढळ जिद्दीचे प्रतीक आहे.

Proud of Indian..! Congratulations to our Men's Junior Hockey Team on scripting history at the FIH Hockey Men’s Junior W...
11/12/2025

Proud of Indian..!

Congratulations to our Men's Junior Hockey Team on scripting history at the FIH Hockey Men’s Junior World Cup 2025! Our young and spirited team has secured India’s first-ever Bronze medal at this prestigious tournament. This incredible achievement inspires countless youngsters across the nation.

श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त शिवशक्ती क्रीडा मंडळ आणि आमदार महेश दादा लांडगे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने भव्य राज्यस...
07/12/2025

श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त शिवशक्ती क्रीडा मंडळ आणि आमदार महेश दादा लांडगे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे भव्य आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेच्या अंतिम फेरी दरम्यान भोसरी विधानसभेचे लोकमान्य, दमदार आमदार पै. महेश दादा लांडगे तसेच आमचे सहकारी पै. कुंदन काळे व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिकृतपणे उजळून निघाला.

या प्रतिष्ठित स्पर्धेत राज्यभरातून अनेक संघांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या स्थानिक नागरिकांनी स्पर्धकांचे मनोबल वाढवत त्यांच्या खेळास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अंतिम फेरीच्या वेळी आमदार महेश दादा लांडगे यांनी स्पर्धकांशी प्रत्यक्ष संवाद साधत मार्गदर्शन, प्रोत्साहन व क्रीडा क्षेत्रातील संधींबाबत मोलाचे विचार मांडले. खेळाडूंच्या जिद्दीचे कौतुक करून त्यांना आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

#श्रीदत्तजयंती #राज्यस्तरीयकबड्डी #महेशदादालांडगे

भारतीय महिला कबड्डीच्या विश्वविजेत्यांना सलाम! कबड्डी वर्ल्ड कप 2025 जिंकून भारतीय महिला कबड्डी संघानं पुन्हा एकदा जगभरा...
26/11/2025

भारतीय महिला कबड्डीच्या विश्वविजेत्यांना सलाम!

कबड्डी वर्ल्ड कप 2025 जिंकून भारतीय महिला कबड्डी संघानं पुन्हा एकदा जगभरात आपली छाप पाडली आहे. त्यांच्या अथक मेहनतीनं, न डगमगणाऱ्या जिद्दीनं आणि उत्कृष्ट टीम वर्कनं आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. ही ऐतिहासिक कामगिरी फक्त एक विजय नाही तर देशभरातील नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी एक शक्तिशाली कहाणी आहे. धैर्य, शिस्त आणि स्वतःवरचा विश्वास या गोष्टी मनात ठेवल्या तर कोणतंही स्वप्न मोठं नसतं आणि कोणतंही लक्ष्य दूर नसतं, हे या विजेत्यांनी सिद्ध केलं आहे.

भारतीय महिला कबड्डी संघाला मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!

अभिमान पिंपरी-चिंचवडकरांचा..! हरियाणा येथे होणाऱ्या किशोर व किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र कबड्डी संघामध...
25/11/2025

अभिमान पिंपरी-चिंचवडकरांचा..!

हरियाणा येथे होणाऱ्या किशोर व किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र कबड्डी संघामध्ये आमदार महेशदादा लांडगे यांची पुतणी कु. समृद्धी कार्तिक लांडगे हिची निवड झाली. तसेच, कबड्डीपटू कु. सेजल आणि कु. कावेरी यासुद्धा महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. शहरात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणारे खेळाडू तयार होत आहेत, ही निश्चितपणे आश्वासक बाब आहे. लांडगे कुटुंबियांचा अभिमान कु. समृद्धी आणि सर्व संघ सहकारी खेळाडुंचे मन:पूर्वक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा-शुभाशिर्वाद आहेत.

Best Of Luck समृद्धी..!

भोसरी विधानसभेचे दमदार आमदार श्री महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त “7-असाईड फुटबॉल PCMC चॅम्पियनशिप 2025” या स्पर...
24/11/2025

भोसरी विधानसभेचे दमदार आमदार श्री महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त “7-असाईड फुटबॉल PCMC चॅम्पियनशिप 2025” या स्पर्धेची उत्साहात सुरुवात झाली.

शत्रुघ्न बापू काटे स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेला युवक, खेळाडू आणि स्थानिक क्रीडा संघटनांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मैदानावर तरुण खेळाडूंचा जोश, संघांचे जयघोष आणि चाहत्यांचा उत्साह पाहून संपूर्ण वातावरण रंगून गेले होते.

दमदार व विकासपुरुष आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हिंदुभूषण क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत, किरणदादा...
24/11/2025

दमदार व विकासपुरुष आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हिंदुभूषण क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत, किरणदादा पाटील यांच्या तर्फे भव्यदिव्य जिल्हास्तरिय कराटे स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले.

या स्पर्धेत विविध वयोगटातील शेकडो कराटेपटूंनी अभूतपूर्व असा सहभाग नोंदवला. खेळाडूंची जिद्द, शिस्त, परिश्रम आणि मैदानी कामगिरी पाहून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनापासून कौतुक केले.

हिंदुभूषण क्रीडा महोत्सवाचा मुख्य हेतू युवा पिढीत शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक ताकद, कौशल्य आणि क्रीडा संस्कार रुजवणे, हा या कार्यक्रमाद्वारे यशस्वीपणे साध्य होताना दिसला.

किरणदादा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली उत्कृष्ट तयारी, भव्य आयोजन, तसेच खेळाडूंना दिलेले प्रोत्साहन या सर्व गोष्टींमुळे स्पर्धेला एक वेगळाच दर्जा प्राप्त झाला.

या स्पर्धेच्या माध्यमातून एकता, शिस्त, स्पर्धात्मकता आणि समाजासाठी सकारात्मक विचार यांचे उत्तम प्रदर्शन घडून आले. खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वातून मिळणारे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि क्रीडा क्षेत्राला देत असलेला पाठिंबा यामुळेच आज भोसरी विधानसभा क्रीडा क्षेत्रातही अग्रस्थानी झळकत आहे.

भारतीवासीयांसाठी अभिमानास्पद..! आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय तिरंदाज संघातील खेळाडुंनी लक्षवेधी कामगिरी केल...
19/11/2025

भारतीवासीयांसाठी अभिमानास्पद..!

आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय तिरंदाज संघातील खेळाडुंनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत 10 पदकांची कामाई केली आहे. यामध्ये 6 सुवर्णपदक, 3 रौप्य आणि 1 कांस्यपदाकाचा समावेश आहे. पुरूष रिव्हर्स गटातील सुवर्णपदक 18 वर्षानंतर भारताला मिळाले आहे. तसेच, वैयक्तिक स्पर्धांमध्येही उत्कृष्ट प्रदर्शन झाले असून कम्पाऊंड स्पर्धांमध्ये यशस्वीपणे जेतेपद टिकवून ठेवण्यात आले आहे. ही कामगिरी खरोखरच अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे, जी अनेक उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देणारी ठरेल.

विशेष म्हणजे, भारताच्या जाबाज तिरंदाज संघात आपल्या पिंपरी-चिंचवडमधील तीन खेळाडुंचा समोवश आहे. तिरंदाज प्रतीका प्रदीप, प्रथमेश फुगे आणि प्रशिक्षक कुणाल तावरे यांचा समावेश आहे. प्रत्येक पिंपरी-चिंचवडकरांची मान आज अभिमानाने उंचावलेली आहे.

सर्व यशस्वी तिरंदाजांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा..!

भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त म्हेत्रे वस्ती चिखली येथे मा. श्री. पांड...
18/11/2025

भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त म्हेत्रे वस्ती चिखली येथे मा. श्री. पांडुरंग साने यांच्या वतीने हॉली बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जास्तीत जास्त खेळाडूंची उपस्थिती आणि अमर्याद नागरिकांचा सहभाग लक्षणीय ठरला. या ठिकाणी उद्योजक मा. श्री. कार्तिकजी लांडगे व स्थानिक नेते उपस्थित होते.

Address

Mali Ali, Bhosari Gaonthan
Bhosari
411039

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahesh Dada Sports Foundation #MDSF posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahesh Dada Sports Foundation #MDSF:

Share

Category